
गडचिरोली,दि.1:- माहे जूलै 2019 ते सप्टेंबर2019 मध्ये मुदत संपणाऱ्या अहेरी तालुक्यातील रिक्त सदस्य पदांची पोट निवडणूक ग्रामपंचायत कुरुमपल्ली(प्रभाग क्र. 1व 2 ) येडमपल्ली (प्रभाग क्र.1 व 3 ) रेगुलवाही (प्रभाग क्र.2 व3) किष्टापूर दौड (प्रभाग क्र3) देचली (प्रभाग क्र.2 ) गोविंदगाव (प्रभाग क्र.3 ) दामंरचा (प्रभाग क्र.1 व 3) येरमनार (प्रभाग क्र.2 व 3 )आरेंदा (प्रभाग क्र 1) पल्ले (प्रभाग क्र1,2व3) वट्रा खु.स( प्रभाग क्र 2) मांडरा( प्रभाग क्र3 ) येथील निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे. जी. सोरते ,अव्वल कारकुन तहसिल कार्यालय अहेरी यांची नियुक्ती करण्यांत आली होती. पंरतु प्रशासकीय कारणास्तव सदरील आदेशात अशंत:बदल करण्यात येत असून वरील ग्रामपंचायतीचे रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणूकीकरीता एस. व्ही. श्रीरामे, मंडळ अधिकारी , आलापल्ली तहसिल कार्यालय अहेरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूकीसाठी निवडणूकीचा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
अ.क्र. | निवडणूकीचे टप्पे | दिनांक व वेळ |
1 | तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक | दिनांक 22/05/2019 (बुधवार) |
2 | नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ | दि.31/05/2019 (शुक्रवार) ते 06/06/2019 (गुरुवार)
वेळ सकाळी 11.00 ते दु.3.00(दिनांक 2जून 2019 चा रविवार व दिनांक 5 जून 2019 ची सार्व सुट्टी वगळून |
3 | नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ | दि.7 जून 2019 (शुक्रवार) वेळ स.11.00 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत |
4 | नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ | दि. 10 जून 2019 (सोमवार) दुपारी 3.00 वाजेपर्यंत. |
5 | निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ. | दि.10जून 2019 (सोमवार) दुपारी 3.00 वा. पर्यंत |
6 | मतदानाचा दिनांक | दि. 23 जून 2019 स.7.30 वा. ते दुपारी 3.00 वा. पर्यंत) |
7 | मतमोजणीचा दिनांक | दि. 24 जून 2019 (सोमवार) |
8 |
निवडणूकीचा निकाल प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक | 27 जून 2019 ( गुरुवार ) |
पोटनिवडणूकीत मतदारांनी कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता मतदान करावे असे तहसिलदार अहेरी यांनी केले आहे.