
गडचिरोली,दि.1:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी) पुणे पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED)गडचिरोली द्वारा आयोजित अनूसूचित जाती प्रवर्गाकरीता 1 दिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम दि. 27 मे 2019 रोजी दुपारी 12.30 वाजता आदिवासी वस्तीगृह , मनोरंजन हॉल ,पोटेगाव रोड, गडचिरोली. येथे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मनीष गणवीर, प्रकल्प अधिकारी, प्रमुख पाहुणे सेवकराम बडे, जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, आयोजक संदिप जाने , प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हे उपस्थित होते. मनीष गणवीर यांनी अध्यक्षीय भाषणात उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग कसा उभारावा , उद्योग कसा निवडावा, या संदर्भात माहिती दिली. तसेच सेवकराम बडे, यांनी महामंडळाचे कर्ज विषयक योजना , जिल्हा उद्योग केंद्राचे कर्ज विषयक योजनेविषयी माहिती दिली.
प्रास्ताविक संदिप जाने ,प्रकल्प अधिकारी, यांनी केले, कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अमित रामटेके, कार्यक्रम समन्वयक, यांनी केले.