43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राष्ट्रीय देश आसाराम बापूचा मुलगा नारायण साईला जामीन

आसाराम बापूचा मुलगा नारायण साईला जामीन

0
21

blank

अहमदाबाद- सुरतच्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला गुजरात उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांचा सशर्त जामीन दिला आहे. गेल्या वर्षभरापासून नारायण साई तुरुंगात होता. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी आसाराम बापूही तुरुंगात आहे.
आजारी आई लक्ष्मीबेन हरपलानी हिला भेटायचे असल्याचे कारण सांगून नारायण साईने जामीन मिळण्याबाबत अर्ज सादर केला होता. लक्ष्मीबेन मणक्याच्या आजाराने आजारी असून तिच्यावर अहमदाबादच्या स्टेरलिंग हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यात येणार आहे. नारायण साईच्या अर्जावर सुनावणी करताना न्यायाधीश पारेश उपाध्याय यांनी जामीन मंजुर केला आहे. डिसेंबर 2013 पासून तो सुरतच्या तुरुंगात होता.

blank