33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ अहेरीत राजे अम्ब्रीशराव आत्रामांचा उमेदावरी अर्ज दाखल

अहेरीत राजे अम्ब्रीशराव आत्रामांचा उमेदावरी अर्ज दाखल

0
29

अहेरी,दि.05- भाजपाचे अहेरी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार विद्यमान आ. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी ४ ऑक्टोबर रोजी भव्य शक्ती प्रदर्शन करीत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला नामांकन दाखल केला.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी नामांकन दाखल करण्यापूर्वी स्व. राजे विश्‍वेश्‍वरराव महाराज यांच्या पुतळय़ाला अभिवादन करून रॅलीचा प्रारंभ केला. या रॅलीमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, प्रकाश गेडाम, अवधेशरावबाबा आत्राम, अहेरी विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य, पं.स. सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. विविध घोषणा देत रॅली उपविभागीय कार्यालयात पोहोचली

blank