
नगराध्यक्षांची ग्वाही : नागरिक झाले आक्रमक
गोंदिया : शहरातील कुंभारेनगर येथे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या सांडपाणी व्यवस्थापनाच्या समस्येवरून कुंभारेनगर येथील नागरिकांनी आक्रमक होऊन थेट नगराध्यक्ष व मुख्याधिकार्यांकडे ही समस्या मांडले. ही समस्या दूर करण्याची ग्वाही त्यांना देण्यात आली.
प्रतिनिधी मंडळाने नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांची भेट घेऊन समस्येची माहिती त्यांना दिली. यावर तोडगा काढण्याकरिता जायस्वाल यांनी मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्याशी चर्चा करून या समस्येचे निराकरण करण्याचे ठरविले. याकरिता दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कोट्यवधींच्या निधींनी गोंदिया शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाची समस्या सोडविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
याअंतर्गत कुंभारेनगर परिसरातील सांडपाणी साठवण झालेल्या जागेची पाहणी करण्याकरिता नगराध्यक्ष कशीश जायस्वाल, मुख्याध्याधिकारी सुमंत मोरे, शिव शर्मा, अभय अग्रवाल, रवींद्र कावळे, फिरोज बिसेन यांनी सांडपाणी साठवण झालेल्या जागेची पाहणी केली व याकरिता दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कोट्यवधीचा निधी लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.





