28.1 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home Featured News ‘एक दुपार-गोंडवाना र% तारामजी के नाम’

‘एक दुपार-गोंडवाना र% तारामजी के नाम’

0
60

गोंदिया,दि.12 : सालेकसा तालुक्यातील धनेगाव (कचारगड) येथे आदिवासी भाषा संशोधन केंद्रात गोंडवाना र% सुन्हेरसिंह ताराम यांच्या प्रथम स्मृतिदिनी ७ नोव्हेंबर रोजी आयोजित गोंडवाना दर्शन-साहित्य सरिता चर्चासत्रानंतर एक दुपार-गोंडवाना र% तारामजी के नाम अशी काव्यमैफल चांगलीच रंगली.
दिवसभराच्या या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष राजनांदगाव येथील ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक भरतलाल कोराम यांनी एका आदिवासी साहित्य संमेलनातील एक प्रसंग सांगितला. एका निरक्षर वृद्ध माणसाने सुन्हेरसिंह ताराम यांच्या जवळ आपली व्यथा अल्प शब्दात मंडळी होती. ते शब्द मुझे दर्पण दिखा दो, मुझे चष्मा दे दो . ह्या काव्यमय ओळी तारामजींना इतक्या भावल्या की त्यातील गर्भितार्थासाठीच तारामजी जगले. त्यांच्या साहित्यिक पत्नी उषाकिरण आत्राम यांनी त्या ओळी तारामजींच्या समाधीवर कोरून त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणखीच उजागर केल्याचे भरतलाल कोराम म्हणाले. तेव्हा तारामजी अमर रहे अशा घोषणा उत्स्फूर्तपणे उपस्थित र्शोते आणि रसिकांनी दिल्या.
हेच सूत्र पकडून काव्यमैफलीचे सूत्रधार कवी रमेश शर्मा म्हणाले की आपला आदिम चेहराच हरवलेल्या आदिवासींच्या जागृतीसाठी, उत्थानासाठी, सांस्कृतिक, साहित्यिक आणि वैचारिक आंदोलनासाठी त्या निरक्षर वृद्ध माणसाचे ते शब्द तारामजीसाठी घोषवाक्य आणि ध्येयवाक्य झाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा या मंत्राईतकेच तारामजींनी अंगीकृत केलेले ते घोषवाक्य क्रांतिकारी आणि कल्याणकारी असल्याचे शर्मा यांनी उच्चारताच सर्वांनी टाळ्यांच्या गजराने यथोचित प्रतिसाद दिला.
आणि एकेका कवीची वैशिष्ट्ये सांगत त्यांनी कवींना कविता वाचनासाठी पाचारण केले. कवयित्री किरण मोरे, प्रा.इंद्रकला बोपचे, प्रा.रेखाताई जुमानके वर्धा, रमाताई टेकाम बालाघाट, कविश्री लखनसिंह कटरे, युवराज गंगाराम, बापू इलमकर,शशी तिवारी, मनोज बोरकर,छगन पंचे, माणिक गेडाम आदींनी हिंदी, मराठी आणि झाडीबोलीतील कविता सादर करून रसिकांची वाहवाह मिळविली. शेवटी उषाकिरण आत्राम यांनी सर्वांचे आभार मानून येत राहा अशी विनंती केली.