24.8 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home विदर्भ अंगणवाडी पर्यवेक्षीका श्रीवास्तवची करा चौकशी

अंगणवाडी पर्यवेक्षीका श्रीवास्तवची करा चौकशी

0
42

गोरेगाव,दि.14ः-गोरेगाव तालुका एकात्मीक बालविकास सेवा व योजना प्रकल्प कार्यालयातंर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी पर्यवेक्षीका अनविता श्रीवास्तव या आपल्या हेकेखोर स्वभाने त्रास देत असून कार्यालयीन वेळेत कधीच हजर न राहता अंगणवाडी सेविकांना असभ्य भाषेचा वापर करुन त्रास देत असल्याची तक्रारच वरिष्ठांकडे सुकपूर(बोरगाव)येथील अंगणवाडी सेविका कल्पना मेश्राम यांनी केली आहे.
श्रीमती श्रीवास्तव या आधी गोंदिया एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयामध्ये कार्यरत होत्या.त्यानंतर त्यांची बदली गोरेगाव येथे झाली असून त्या कधीही कार्यालयीन वेळेत हजर राहिलेल्या नसून दररोज गोरेगाव ते नागपूर असा प्रवास करीत असल्याचाही उल्लेख केला आहे.अंगणवाडी सेविका कल्पना मेश्राम यांनी दिलेल्या तक्रारीत कवलेवाडा बीटतंर्गत आपले गाव येत असून गावात येऊन आपल्याला त्रास सोबतच परिसरातील ८० टक्के अंगणवाडी सेविका यांच्या त्रासापासून त्रस्त असून भीतीमुळे त्या तक्रार नोंंदवित नसल्याचेही म्हटले आहे.
असभ्य वागणूक करणे,सेविकांना सकाळी ९ वाजता बोलावून स्वतः१२ वाजता कार्यालयात येणे,स्वतःचे काम स्वतः न करता अंगणवाडी सेविकांच्या हातून करवून घेणे,मुख्यालयात न राहता विदर्भ एक्सप्रेस रेल्वेने दररोज अपडाऊन करुन दुपारी २ वाजता परत जाणे,शासनाच्या परिपत्रकाची माहिती न देणे,सेविकांना मासिक सभेत असभ्य भाषेचे वापर करणे,मोबाईलची माहीती न देता सेविकांकडून मोबाईल हिसकावणे,भेटीकरीता आलेले रजिस्टरवर स्वाक्षरी न करता सोबत नेणे,मला जातीवाचक शिविगाळ करुन अगंणवाडी सेविका पदावरुन कमी करण्याची धमकी देणे,माझ्याविरुध्द कुणाची तक्रार करण्याची ताकद नाही,जो करेल त्याला पदावरुन कमी करुन टाकणार अशाप्रकारचे आरोप तक्रारीत करण्यात आले असून तक्रारदार अंगणवाडी सेविकेने तर आपल्यासोबत काही कमीजास्त झाल्यास सदर पर्यवेक्षिका जबाबदार असणार असे म्हटले आहे.