24.8 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home विदर्भ तिगाव येथे रविवारला शेतकरी मंथन महामेळावा

तिगाव येथे रविवारला शेतकरी मंथन महामेळावा

0
27

आमगाव,दि.14: क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त तसेच संवैधानिक भारत राष्ट्रनिर्माण अभियानांतर्गत शेतकरी मंथन महामेळावा, आरोग्य शिविर, रक्तदान शिबिर व सत्कार समारोहाचे आयोजन रविवार (दि.१७) सकाळी ९ वाजता तालुक्यातील तिगाव येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत आरोग्य व रक्तदान शिबिराचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. व्ही.पी. रूखमोडे यांच्या हस्ते आमदार सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शाम निमगडे, माजी मंत्री भरत बहेकार, जि.प.सदस्य जियालाल पंधरे, पं.स.सदस्य अशोक पटले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पटले, डॉ. वानखेडे, डॉ. एच.एन.मेश्राम, डॉ. गावडकर, डॉ. रहांगडाले, कृष्णा पटले, नरेंद्र बहेटवार यांच्यासह पोलीस पाटील व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दुसèया सत्रात राज्यकर्ते बदलतात पण शेतकèयांची अवस्था का बदलत नाही या विषयावर कैलास डोंगरे यांच्या हस्ते परिसंवादाचे उद्घाटन होणार आहे. मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ संपादक प्रकाश पोहरे उपस्थित राहणार आहेत. तर कुटुंब समाजाच्या घडणघडनेत महिलांचे योगदान व भूमिका या विषयावर प्रा.नुतन माडवी मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमात प्रगतीशील शेतकरी अशोक गायधने व भुवनेश ठाकरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पाहुणे म्हणून ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बी.एन, करमकर, डॉ. जी.ए.येडेवार, पुष्पाताई खोटेले, चेतन उईके, विजय फुंडे, हिदायत शेख, राधाकृष्ण चुटे, कन्हैया बोपचे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून सरपंच नरेंद्र शिवणकर, तर सत्राध्यक्ष म्हणून ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे राहणार आहेत. रात्री ८ वाजता संगीतमय प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.