गोंदिया,दि.१५ः- तालुक्यातील मुर्री ग्रामपंचायतीच्या उपसरंपच पदासाठी झालेल्या निवडणुकीत ओमप्रकाश(छोटूभाऊ)रहागंडाले यांची निर्विरोध निवड करण्यात आली आहे.निवडणुक कार्यक्रमाची अध्यक्षता सरपंच हेमंत येरणे यांनी केली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य तिर्थराज रहागंडाले,करण टेकाम,मिनाताई टालटे,पुजाताी बिजेवार,पुष्पाताी शरणागत,ब्रम्हानंद शहारे उपस्थित होते.जिल्हा परिषद सभापती शैलजाताई सोनवाने विशेषत्वाने उपस्थित होते.याप्रसंगी सरपंच सुधीर चंद्रीकापुरे,कमलेश सोनवाने,राध्येशाम शरणागत,शालिक इरक्से,अनुभव गजभिये,महेंद्र टेंभेकर,कुवरलाल सोनवाने,,दिलीप टालटे,राहुल शरणागत,सतीश शरणागत,अतुल शरणागत,विक्की कावळे,राजु रहागंडाले,उत्तमचंद शरणागत आदी गावकरी उपस्थित होते.




