भंडारा,दि. 16 :– समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे दिनांक 18 नोव्हेंबर 2019 रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात आलेला आहे. महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करण्याकरीता तक्रार अर्जाचा नमुना जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, शिवाजी क्रिडा संकुल, बस स्टॉप जवळ भंडारा येथे उपलब्ध आहे. जिल्हा स्तरीय महिला लोकशाही दिनात तक्रार अर्ज सादर करतांना अर्जासोबत जिल्हाधिकारी यांना उद्देशुन अर्ज, तालुका महिला लोकशाही दिन टोकन क्रमांक,प्रत, तहसिलदाराच्या उत्तराची प्रत (प्रकरण थेट जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित असेल तर तालुका महिला लोकशाही दिनातील टोकन क्रमांक व त्याची प्रत आवश्यक राहणार नाही)सोबत जोडावी. महिला लोकशाही दिनात न्याय प्रविष्ठ प्रकरणे , सेवा विषयक, आस्थापना विषयक, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर अशा तक्रारी स्विकारण्यात येणार नाहीत. माहिला लोकशाही दिनी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत राहील, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, भंडारा यांनी कळविले आहे.




