गोंदिया दि. 16 : नागपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यातील सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरीता वैद्यकिय, अभियांत्रिकी व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या (ST) राखीव जागेवर प्रवेश घेणाऱ्या किंवा प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थांना त्यांचे अनुसूचित जमातीचे जमात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव 28 फेब्रुवारीपर्यंत समिती
कार्यालयात सादर करण्याचे आवाहन सहआयुक्त विनोद पाटील यांनी केले. शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या व वरील अभ्यासक्रमासाठी इच्छुक असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जमात प्रमाणपत्र तपासणी प्रस्ताव त्रुटीरहित शैक्षणिक संस्थेमार्फत मुदतीच्या आत समितीच्या www.etribevalidity.mahaonline.
0712-2560031 यावर संपर्क साधण्याचे आवाहन अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नागपुर चे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष विनोद पाटील यांनी केले.




