33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री फडणवीस इस्रायला रवाना

शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री फडणवीस इस्रायला रवाना

0
21

मुंबई : कृषी तंत्रज्ञानाविषयक अभ्यास दौऱ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेवृत्वाखाली महाराष्ट्राचे शिष्टमंडळ आज सायंकाळी इस्त्रायलच्या चार दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले. हा दौरा इस्त्रायल सरकारच्या निमंत्रणावरुन आयोजित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्यासह विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव दिनेश कुमार जैन यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. तेल अव्हिव विद्यापीठात होणाऱ्या या परिसंवादाचे मुख्यमंत्री इस्त्रायलच्या कृषी व अर्थमंत्र्यासह संयुक्तरित्या उद्घाटन करणार आहेत.

या अभ्यास दौऱ्यामध्ये विविध कृषी विषयक तंत्रज्ञानावर चर्चा होणार असून कमीत कमी पाण्यात अधिकाधिक पिके घेण्याच्या इस्त्रायली तंत्रज्ञानाची माहिती राज्याचे शिष्टमंडळ घेणार आहे. याबाबत संबंधित कृषी तज्ज्ञांशी मुख्यमंत्री विविध बैठका घेणार असून पाण्याच्या बचतीसह पुनर्वापर तंत्रज्ञानाबाबतही माहिती घेणार आहेत. मराठा चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, फिनोलेक्स, जैन इरिगेशन आदींसह प्रमुख इस्त्रायली उद्योग समूह महाराष्ट्रातील विविध संस्थाशी याबाबतीत सहकार्य करण्यास उत्सुक आहेत. या दौऱ्यात राज्याचे शिष्टमंडळ विविध कृषी व औद्योगिक प्रकल्पांना भेटी देण्यासोबत विविध नागरी सुविधाविषयी प्रकल्पांचीही पाहणी करणार आहेत. त्याचबरोबर स्मार्ट सिटी संदर्भातही भेटी देणार आहेत.

blank