24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ नक्षत्राचं काव्यमंचची जिल्हा बैठक सौंदड येथे उत्साहात

नक्षत्राचं काव्यमंचची जिल्हा बैठक सौंदड येथे उत्साहात

0
39

सडक अर्जुनी,दि.१८ः नक्षत्राचं देणं काव्यमंच शाखा गोंदिया जिल्ह्याच्या वतीने सौंदड/रेल्वे येथे ,नक्षत्राचं काव्यमैफील संमेलन तसेच जिल्हा बैठकीत तालुक्यातील पत्रकारांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आले. या संमेलनाचे उद्घाटक कविवर्य नरेंद्र पोतदार होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष राम महाजन होते. यावेळी कविवर्य दिवाकर मोरसकर,एकनाथ बुध्दे सर,सुशिल लाडे,पालिकचंद बिसने,प्रा.अश्विनी खांडेकर पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात नाट्यकलावंत चुळीराम (चंदू ) पाथोडे,सौ.किरण मोरे सालेकसा,मुरलीधर खोटेले देवरी,बाजीराव तरोणे सालेकसा,जीवनलाल हिरापूरे तिरोडा,केवलचंद शहारे सौंदड,सुदर्शन लांडेकर देवरी,अश्लेष माडे कोहोमारा,सदाशिव कुरसुंगे,पांडुरंग मारगाये सौंदड,प्रेमेश्वर बारसागडे,युगल बारसागडे,शकुंतला झोडे, सौ.संगीता ठलाल, बबलू मारवाडे,डुडीश्वर सुरसाउत,राजेश मेश्राम ,आर.मेश्राम,शत्रुघ्न लांजेवार,उमाताई गजभिये,सौ.कलावती कोल्हटकर,महेंद्र कोल्हटकर,शिवम राठोड,फिरोज दोनोडे,दिपकुमार पाथोडे असे गडचिरोली ,भंडारा आणि गोंदिया या तिन जिल्ह्यातील कविंनी सहभाग घेतला.चुळीराम पाथोडे यांनी उपस्थित कविना अखिल भारतीय काव्यसंमेलन ओझर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली.पालिकचंद बिसने यांनी संचालन केले. अश्विन खांडेकर यांनी आभार मानले.