
गोंदिया,दि.18 : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या असून यंदा सर्व रेकॉर्ड मोडत जनतेचे उमेदवार विनोद अग्रवाल यांना विजयी करण्यात कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे. प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी तसेच प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष रूपात मदत केलेल्यांचा मी ऋणी असून ५ वर्ष हे गोंदियाच्या जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित असल्याचे विचार आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले. प्रत्येक कार्यकर्त्याने तसेच पदाधिकाऱ्याने सबका साथ सबका विकास हा मूलमंत्र जपत समाजाच्या अंतिम टोकापर्यंत विकासकार्य पोचवण्याचे कार्य करावे असे आवाहनही त्यांनी १७ नोव्हेंबरला पोवार बोर्डिंग येथे आयोजित कार्यकर्त्या मेळाव्यात केले.नवनिर्वाचित आमदार विनोद अग्रवाल यांचा सत्कार समारंभ पार पडला.
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त करत पुढील वाटचालींसासाठी आवश्यक सूचना उपस्थित कार्यकर्त्यांना केल्या तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या ताकदीने सामोरे जाण्यासंदर्भात आवाहन केले. योग्य मानसन्मान तसेच गोंदिया विधानसभेच्या विकासाला जो प्राधान्य देईल तिकडेच आपला कल असावा अशी कार्यकर्त्यांची भावना आमदार विनोद अग्रवाल यांनी बोलून दाखवली. या पुढील सर्व निर्णय कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्या सहमतीने घेण्यात येतील याचा पुनरोच्चर देखील केला. आपल्या कामाने गोंदिया विधानसभेत इतिहास घडविल्याचे कार्य केले आहे, ३५ वर्षाच्या राजकीय कालखंडात स्वतःच्या पक्षाच्याच विरोधात निवडणूक लढविण्याची वेळ येईल अशी कल्पना देखील मी कधी केली नव्हती. हा माझा विजय नसून गोंदिया विधानसभेच्या जनतेचा विजय आहे तसेच हा विजय मी गोंदियाच्या जनतेला समर्पित करत असल्याचे आमदार विनोद अग्रवाल म्हणाले.
दरम्यान भाऊराव उईके, घनशाम पानतावणे, बेबी अग्रवाल, कशिश जयस्वाल, सोनू कुथे, दीपक बोबडे, मुनेश रहांगडाले, सुजित येवले, टीटूलाल लिल्हारे, कमलेश सोनवाने, शैलजा सोनवाने, विनोद किराड, पन्नालाल मचाडे, लखन हरिणखेडे, रामराज खरे, गुड्डू मिश्रा, परसराम हुमे, चेतन बहेकार, चवनलाल रहांगडाले, मोहन गौतम, ज्ञानचंद जमईवार, सुंदरलाल अग्रवाल, बंटी श्रीबांसरी, अमित बुद्धे, दुर्गेश रहांगडाले, सचिन शेंडे, रेखा लिल्हारे, सविता विनोद अग्रवाल, दीपा सुधीर चंद्रिकापुरे, अभय मानकर, अनुराग शुक्ला, राम पुरोहित, ज्ञानचंद जमईवार, जितलालजी पाचे, हंशुजी वासनिक, रॉकी नायक, भूमिता येडे तसेच अन्य प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.




