24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ आदिवासी गोवारी शहिद दिन कार्यक्रमात जिल्ह्यातून हजारो समाजबांधव सहभागी होणार

आदिवासी गोवारी शहिद दिन कार्यक्रमात जिल्ह्यातून हजारो समाजबांधव सहभागी होणार

0
60

गोंदिया,दि.18 : गोवारी समाजाला आदिवासीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी गोवारी समाज बांधावांनी २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपूर येथे आयोजित विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला होता. त्यावेळी शासनाच्या वतीने  परिस्थिती योग्य पध्दतीने हाताळण्यात न आल्याने तसेच पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे चेंगराचेंगरी होवून ११४ गोवारी बांधव शहिद झाले. ज्या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला ती मागणी सरकारने पूर्ण केलेली नाही. शेवटी समाजाच्या वतीने न्यायालयीन लढा देण्यात आला व उच्च न्यायालयाने गोवारी समाजाला न्याय दिला.
२३ नोव्हेंबर १९९४ गोवारी समाजाला न्याय हक्क मिळविण्यासाठी काढण्यात आलेल्या नागपूर विधानसभेवरील मोर्च्यात शहिद झालेल्या ११४ गोवारी बांधवाच्या स्मृतिप्रित्यर्थ यंदाही आदिवासी गोवारी २५ वा श्रध्दाजंली कार्यक्रम नागपूर येथे शहिद स्मारक ठिकाणी २३ नोव्हेंबर २०१९ सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातून हजारो समाजबांधव रवाना होणार आहेत. शहिद स्मारक स्थळी जाण्याकरीता कोणतेही अडचण होवू नये, याकरीता समाजबांधवांसाठी बिल्ल्यांची व्यवस्था करण्यात आली असून आदिवासी गोवारी समाज बांधवांनी संघटनेचे बिल्ले लावून सहभागी व्हावे तसेच समाजावर झालेल्या अन्याय, अत्याचाराविरोधात संघर्षाची ज्योत तेवत ठेवावी, असे आवाहन आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्टÑचे गोंदिया शहर अध्यक्ष सुशिल राऊत, प्रकाश फुन्ने, गोकूल बोपचे, के.के.नेवारे, जगदिश शेंद्रे, रूपचंद राऊत, योगीराज फुन्ने, कृष्णा फुन्ने, अशोक बोपचे, प्रा.अनिल बोपचे, गोवर्धन बोपचे, बादल आंबेडारे, बी.ए.राऊत, अरविंद राऊत, संजय राऊत यांनी केले आहे.

ग्रामीण व रेल्वे पोलिसांना निवेदन  
२३ नोव्हेंबर १९९४ गोवारी समाजाला न्याय हक्क मिळविण्यासाठी काढण्यात आलेल्या नागपूर विधानसभेवरील मोर्च्यात ११४ आदिवासी गोवारी बांधव शहिद शहिद झाले. शहिदांच्या स्मृतिप्रित्यर्थ २३ नोव्हेंबर २०१९ रोजी नागपूर येथील आयोजित श्रध्दाजंली कार्यक्रम जिल्ह्यातून हजारो समाजबांधव सहभागी होणार आहेत. याची पुर्वसूचना म्हणून आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्टÑचे गोंदिया शाखेच्या वतीने ग्रामीण पोलिस व रेल्वे पोलिसांना १६ नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले. १५ ते २० हजार समाज बांधव २३ नोव्हेंबर रोजी सकाळी लोकल व महाराष्टÑ एक्सप्रेसने रवाना होणार आहेत. याची खबरदारी म्हणून निवेदन देण्यात आले. यावेळी आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्टÑचे गोंदियाचे शहर अध्यक्ष सुशिल राऊत, सचिव प्रकाश फुन्ने, अशोक बोपचे, जगदिश शेंदरे आदिंसह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
०००००००