33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ जिल्हा ग्रंथालय संघाचे विसावे वार्षिक अधिवेशन माेहाडी येथे संपन्न

जिल्हा ग्रंथालय संघाचे विसावे वार्षिक अधिवेशन माेहाडी येथे संपन्न

0
75

गाेरेगांव,दि.26ःजिल्हा ग्रंथालय संघ गाेदिया व आदर्श सार्वजनिक वाचनालय माेहाडी याच्या संयुक्त सहकार्याने माेहाडी येथे दिंनाक 22 डिसेंबरला विसावे वार्षिक अधिवेशन संपन्न झाले. आमदार मनाेहरजी चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेत जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढाेणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. स्वागताध्यक्ष समाज कल्याण सभापती विश्वजित डाेंगरे,शिवकुमार शर्मा कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ मुंबई,खाेमेंन्द्र बाेपचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी भंडारा,डॉ.नरेंद्र आरेकर,लश्मनरावजी चंद्रिकापुरे,अार. बी. गुप्ता प्राचार्य,डॉ. कविता राजाभाेज,भाऊराव पत्रे,शिवकुमार शर्मा, तुलाराम डाेंगरे,बाबा बहेकार आदी उपस्थित हाेते.ग्रंथमित्र यशवंत चाैरागडे यांनी 38 वर्षाचा प्रगती अहवाल सादर केला.तसेच जिल्हा ग्रंथालय संघाचे अहवाल डि. डी. रांहागडाले यांनी सादर केले.
शिवकुमार शर्मा यांनी ग्रंथालय व कर्मचारी ,सेवक यांच्या पन्नास वर्षातील अडचनी आमदारासमाेर मांडल्या. आमदार मनाेहरजी चंद्रिकापुरे यांनी विधानसभेत ग्रंथालय समस्येकडे विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले. सर्व ग्रंथ प्रेमीना माेलाचे मार्गदर्शन करुन ग्रंथालयीन समस्या साेडविण्याचे पुरेपुर प्रयत्न करणार असलेल्याचे सांगितले.अरविंद ढाेणे यांनी सुध्दा ग्रंथालया विषयी मार्गदर्शन केले.डॉ. नरेंद्र आरेकर यांनी समाजातील नागरिकासाठी ग्रंथ व ग्रंथालय किती आवश्यक आहेत, याविषयी सखाेल मार्गदर्शन विविध उदाहरणे देऊन सांगितले. अधिवेशनाचे दुसरे सत्रात शासकीय अनुदानाशिवाय ग्रंथालये चलविने शक्य आहे का? या विषयी कविता राजाभाेज, शिवकुमार शर्मा, यांनी आपले विचार व्यक्त करुन मार्गदर्शन केले.
अधिवेशनाचे तिसरे सत्रात समाराेपीय सभारंभात अरविंद ढाेने, खाेमेन्द्र बाेपचे यांनी ग्रंथालय कर्मचारी सेवक व पदाधिकारी कार्यकर्ता यांच्या समस्याचे निराकरण केले.
अधिवेशनाचे संचालन डि. आर. चाैरागडे यांनी केले.आधिवेशन यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष ग. तु. पटले, मदनलाल बघेले,वाय. डी. चाैरागडे,हिरालाल महजन,चंन्द्रकुमार चाैरागडे, देवदास चेचाने, जागेशर पटले,प्रमानंद तिराले, नरेंद्र कुमार चाैरागडे, रामलाल बोले, धुर्वराज पटले, हिवराज चाैरागडे, कैलास गाैतम, लिखीराम चाैरीवार आदीनी विशेष सहकार्य केले.