33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ देवरी येथील ‘गुड मार्निग गृप’च्या वतीने विशेष योग शिबिराचे आयोजन

देवरी येथील ‘गुड मार्निग गृप’च्या वतीने विशेष योग शिबिराचे आयोजन

0
36

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त डॉ. दीपक धुमनखेडे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

देवरी,दि.२१ -आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत देवरी येथील ‘गुड मॉर्निंग ग्रुप’च्या वतीने आज रविवारी (दि.२१) विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या छोटेखानी विशेष योग शिबिरात नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला.
यावेळी सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक धुमनखेडे यांच्या नेतृत्वाखाली योग, आरोग्य आणि निरोगी जीवनशैली याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “योग ही केवळ शारीरिक कसरत नसून शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्रितपणे संतुलित ठेवणारी जीवनपद्धती आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविणे ही काळाची गरज आहे.”
डॉ. धुमनखेडे यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि त्यांच्या आरोग्यदायी फायद्यांविषयी उपस्थितांना प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये योगाबद्दल जागरूकता निर्माण झाली आणि नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प अनेकांनी केला.
या कार्यक्रमामुळे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला असून, निरोगी आणि आनंदी जीवनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित झाले. गुड मॉर्निंग ग्रुपच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. शिबिराचे यशस्वी आयोजनासाठी गृप लीडर राजेंद्र अग्रवाल, सुरेश शाहू,ओमकार शाहू,अनमोल खोब्रागडे,प्रभू डोंगरे,जितेंद्र वासनिक,देवचंद बहेकार, रिजवान शेख,विजय पाटील,अरुण दखने,अरविंद तरोणे,आनंद डोंगरे,रमेश यावलकर,रामलाल पद्मे,श्री.बडोले, श्री शहारे, विजय टेंभूर्णीकर, नितेश पेटकुले, उमेश राऊत, रणजीत मेश्राम,कमलेश शाहू आदींनी सहकार्य केले.