38 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ ११४ शहीद गोवारी बांधवांना श्रद्धांजली

११४ शहीद गोवारी बांधवांना श्रद्धांजली

0
54

गोंदिया,दि.26ः येथील मरारटोली खिल्या मुठया देवस्तानात २५ डिसेंबर रोजी आदिवासी गोवारी समाज संगठन दवारे आयोजित ११४ शहीद गोवारी श्रद्धांजली कार्यक्रम व रक्तदा्न शिबिर व प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शहरात पारंपारीक गोवारी नृत्यासह भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
व्यासपीठावर आ.विनोद अग्रवाल, आदिवासी गोवारी समाजाचे महाराष्ट अध्यक्ष शालीकराम नेवारे, सचिव मंगेश नेवारे नागपूर, अविनाश गजबे, शहर अध्यक्ष डी. टी. चौधरी, ज्ञानेश्‍वर राउत, प्रेमलाल शहारे, राधेश्याम कोहळे, गुलाबराव नेवारे, सुशिल शहारे, युवा ब्रिगेडचे प्रमोद शहारे, विजू भोयर, प्रवीण चौधरी सुनिल राउत आदी उपस््ितत होते. ११४ शहीद गोवारी बांधवांना र्शद्धांजली अर्पण केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, दिवंगत सुधाकर गजबे यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. आदिवासी गोवारी समाजाचे प्रांतीय संघटक गुलाबराव नेवारे यांनी प्रास्ताविकेतून गोवारी समाजाच्या गेल्या ७0 वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानंतर टाटा इंस्टिटयूटच्या निकालाला औचित्य नसल्याचे व आदिवासीच्या सर्व सोयी सवलती गोवारी समाजाला ताबडतोब लागू करण्यात यावा व विकासाच्या प्रवाहापासून वंचित असलेल्या आदिवासी गोवारी जमातीला न्याय देण्यात यावा आदी मागण्यांवर माहिती दिली. सकाळी ११ वाजता इंदिरा गांधी स्टेडियम मधून गोवारी बांधवांची रैली निघाली त्यात पचांग घालून गोवारी बांधवांनी नाचत गायत रैली मरारटोली खिल्या मुठया देवस्तान व सभा ठिकाणी दाखल झाली. या ठिकाणी गोवारी समाजाच्या मुलींनी आदिवासी नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे संचालन टेकचंद चौधरी यांनी तर आभार युवा ब्रिगेड तिरोडाचे अनिल शहारे यांनी मानले.