अर्जुनी मोरगाव,दि.27ः अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विविध समस्या व योजनांचा आढावा येथील पंचायत समितीच्या सभागृहात आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या सभेला पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर,उपसभापती करुणा नांदगावे,गटविकास अधिकारी मयूर अंदेलवाड,जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे,गिरीष पालिवाल,तेजुकला गहाणे,मंदाताई कुंभरे,कमलाताई पाऊलझगडे,जे.के.काळसर्पे,सुधिर साधवाणी,नाजुकताई कुंभरे,लोकपाल गहाणे,योगेश नाकाडे इत्यादि मान्यवर उपस्थित होते. सभेला सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.आमदार चंद्रिकापुरेंचा यावेळी सत्कार करण्यात आला.आ.चंद्रिकापुरेंनी तालुक्यात सर्व योजनांची कामे सुरु करण्यासोबतच घरकुल,रस्तेसह इतर मुद्यावर चर्चा करीत कुठल्याही कामात हयगय चालणार नसल्याच्या सुचना दिल्या.





