भंडारा, दि.28 : भारत देश हा युवांचा देश म्हणून ओळखला जातो. युवांमधील धडाडी, नाविण्य जाणून घेण्याची तळमळ, विज्ञान व तंत्रज्ञान तसेच समाजकार्य करण्याची प्रवृत्ती देशाच्या व राज्याच्या विकास प्रक्रीयेत भारताला महासत्ता बनविण्यात तरुण वर्गाची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते यांनी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी केले.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी काया्रलय तथा जिल्हा क्रीडा परिषद, भंडारा यांच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 27 ते 28 डिसेंबर 2019 या कालावधीत बॅडमिंटन हॉल, जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षीय भाषणातून जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांनी युवकांना प्रोत्साहित करतांना म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी तसेच युवकांच्या अंगी असलेले सुप्त कलागुणांना वाव देवून अव्वल दर्जाचे कलावंत निर्मितीसाठी रंगमंच उपलब्ध होणे आवश्य आहे. प्रास्ताविकात क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांनी कार्यक्रमाचे उद्देश व महत्व विषद केले. सदर स्पर्धेकरीता परिक्षक म्हणून प्रा. डॉ. अस्मिता नानोटी, स्नेहा हांडे, निलकंठ रणदिवे, सारंग हांडे, विनोद पत्थे, लिला झलके यांनी काम पाहिले.
सदर स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न झाल्या असून विभागीय युवा महोत्सवाकरीता लोकनृत्य- लाल बहादूर शास्त्री विद्यालय भंडारा, लोकगीत- गांधी विद्यालय कोंढा,ता. पवनी, एकांकिका- लाल बहादूर शास्त्री विद्यालय भंडारा, तबला- अनिमेश पत्थे, हार्मोनियम-ऋषभ भालेकर, शास्त्रीय गायन-पायल मेहर, भरत नाटयम- प्रविण निपाने, बासरी- शिवशंकर माकडे, मृदुंग- अनिमेश पत्थे, वकृत्व- सौरभ हलमारे यांची निवड झाली असून विजयी संघ, कलाकारांना जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांनी शूभेच्छा दिल्या. युवा महोत्सवाचे संचलन क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांनी केले.स्पर्धेच्रूा यशस्वीतेसाठी क्रीडाअधिकारी त्रिवेणी बांते, रविंद्र वाळके, सुरज लेंडे, रामभाऊ धुडसे, सचिन हुमणे, पराग खोब्रागडे, वसंत पाल यांनी विशेष परिश्रम घेतले.





