32.4 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home Top News कोचिंग क्लासच्या 3 मजली इमारतीला आग लागल्यामुळे 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 4 जण...

कोचिंग क्लासच्या 3 मजली इमारतीला आग लागल्यामुळे 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 4 जण जखमी

0
3
लखनऊ/वृत्तसेवा-कोचिंग क्लासच्या 3 मजली इमारतीला आग लागल्यामुळे 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 4 जण जखमी झाले आहेत. उत्तरप्रदेश राज्यातील लखनऊच्या अलिगंज परिसरातील एका 3 मजली इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर कोचिंग सेंटर सुरू होते.
त्यामध्ये अनेक विद्यार्थी अडकले होते. लखनऊमधील आगीतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. लखनऊमधील रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री फोनवरून बचाव कार्याची माहिती सातत्याने घेत आहेत. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी सांगितले की, लखनऊमधील आगीत एकूण 15 मुलांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत.
बचावकार्य पूर्ण झाले असून, उत्तरप्रदेश सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे आहे. उत्तरप्रदेश सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणातील दोषी असणार्या कोणालाही सोडले जाणार नाही. आणि कडक कारवाई केली जाईल, असे सरकारने म्हटले आहे. मुख्यमंत्री योगी यांनी अलीगढमधील आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते लवकरच घटनास्थळी पोहोचणार आहेत.
लखनऊमधील आगीच्या घटनेवर प्रधानमंत्री मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही आग अचानक लागली. ते एक अॅनिमेशन केंद्र होते. येथे मुले अॅनिमेशन शिकायला येत होते. ही घटना नेमकी कशी झाली, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
जखमींना केजीएमसी ट्रामा सेंटरमध्ये पाठवले जात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेसंदर्भात पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रधान सचिव गृह आणि डीजीपी यांना घटनास्थळी बोलावून, घटनेच्या कारणांची चौकशी करण्याचे आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास लखनऊ पोलिस करत आहेत.