गोंदिया,,दि.28 : कृषी व महसूल विभागाने खरीप हंगामातील धानाची सरासरी आणेवारी काढण्यासाठी जिल्ह्यात संयुक्त सर्व्हे व पीक कापणी प्रयोग केले आहे. सर्व तालुक्यांचा अंतिम अहवाल प्रशासनाने मागविला असून मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सरासरी आणेवारी घोषणा करण्याची तयारी सुरु झाली आहे.
जिल्ह्यात खरीपाच्या हंगामात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रात शेतकर्यांनी धानाचे पीक लावले होते. कापणीनंतर आता मळणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. दरवर्षीप्रमाणे दुष्काळी स्थिती व उत्पादनाचा अहवाल घेण्यासाठी सर्व्हे व प्रयोगाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाव्दारे यावर्षीसुद्धा ३१ डिसेंबर रोजी आणेवारी घोषीत करण्यात येणार आहे. मागील वर्षी कमी पाऊस असताना सुद्धा धान उत्पादन चांगले आले होते. तर मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी धान उत्पादन कमी होण्याचा निष्कर्ष कृषी विभागाने ५0४ पीक कापणीच्या प्रयोगानंतर दर्शविला होता. जेव्हा धानाचे उत्पादन घटले आहे तर आणेवारीत सुद्धा निश्चित घट होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी जिल्ह्यात धानाची सरासरी आणेवारी 0.४४ पैसे घोषित करण्यात आली होती. आता यावर्षी किती होईल, याकडे जिल्ह्यातील शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. याचे कारण म्हणजे, आणेवारीवरच शेतकर्यांशी संबंधित अनेक घोषण निर्भर असतात.