39.9 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home शैक्षणिक “संघर्ष माणसाला जगण्याचं बळ देते”-* प्रा. तुषार उमाळे यांचे प्रतिपादन

“संघर्ष माणसाला जगण्याचं बळ देते”-* प्रा. तुषार उमाळे यांचे प्रतिपादन

0
49

लाखनी,दि.06ः-माणसाच्या जीवनात आलेला संघर्ष माणसाला जगण्याचं बळ देते त्यामुळे संघर्ष करण्याची तयारी आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी आपली असली पाहिजे. जगातील अनेक यशस्वी लोकांनी प्रचंड मोठा संघर्ष केलेला आहे आणि संघर्षातून घडलेल्या व्यक्तिमत्व हे जगाच्या पाठीवर कायम यशस्वी राहिलेलं आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते प्रा. तुषार उमाळे यांनी केले. द लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल लाखनी येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. शाळेच्या प्राचार्या आशा वनवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे संचालक संजय वनवे, आशिष बड़गे, प्रशांत वाघाये उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा. तुषार उमाळे म्हणाले की, विद्यार्थी जीवन अत्यंत महत्वाचे आहे. आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर विद्यार्थी जीवनात मेहनत घेणे अत्यंत आवश्यक आहे. आयुष्यात तुमचं ध्येय ठरवा, जोपर्यंत आपलं ध्येय ठरवलं नसनार तोपर्यन्त आपल्या प्रवासाला दिशा नसेल म्हणून ध्येय ठरवून मोठी स्वप्न बघा आणि त्यांना प्रत्यक्षात उतरवन्यासाठी प्रामाणिक झोकुन देऊन प्रयत्न करा, एक दिवस तुम्ही नक्की यशाला गवसणी घातलेली असेल.
आज सर्व गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत. मात्र इतिहासात काहीही साधनं उपलब्ध नसलेल्या अनेक लोकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोठा संघर्ष करून स्वतःला सिद्ध केलं आणि जगाने त्यांची दखल घेतली. आपन अशा व्यक्तिमत्वांकडून प्रेरणा घेतली पाहिजे आणि आयुष्य उज्वल होण्याच्या दृष्टीने प्रवास करायला पाहिजे.अध्यक्षीय भाषणात शाळेच्या प्राचार्या आशा वनवे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी अभ्यासाला पुरेसा वेळ दिला पाहिजे आणि आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून आपली पकड त्या त्या विषयावर बसवली पाहिजे. सर्व महापुरुषांच्या जीवन प्रवासातुन अनेक गोष्टी शिकन्यासारख्या आहेत त्या आपल्या जीवनात आपन अमलात आणन्याचा प्रयत्न केला पाहिजे.

प्रास्ताविकाच्या माध्यमातून प्रशांत वाघाये यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची उपयुक्तता सांगितली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामिग्रा वनवे हिने केले तर आभार प्रदर्शन वैभव उपासे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्षा पंचबुद्धे, याह्या आकबानी, मिनाक्षी डोरले, प्रिया ठाकरे, पुष्पा मानकर, प्रतिक्षा बंसोड, स्वाती ढेंगे, छाया बावनकुळे, पूजा गोतमारे, कृष्णा उइके, फातिमा शेख यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.