31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ मृतकाच्या कुटुंबाला १५ हजारांची मदत

मृतकाच्या कुटुंबाला १५ हजारांची मदत

0
23

देवरी दि. 7-: सीलापूर येथे आपल्या शेतात काम करीत असताना १६ नोव्हेंबर २0१४रोजी मधमाशांच्या हल्यात मृत पावलेल्या श्रावण गणू कोहळे यांच्या परिवाराला महिला बाल कल्याण सभापती सविता पुराम यांच्या प्रयत्नाने १५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
शेतात काम करीत असताना श्रावण कोहळे, हिरामण कोहळे यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. त्यात श्रावण कोहळे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर देवरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन गोंदियाला पुढील उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. कोहळे यांच्या कुटुंबाद्वारे कृषी विभाग व महसूल विभागाला मदतीची मागणी करण्यात आली. परंतु दोन्ही विभागाकडून कसलीही मदत मिळाली नाही. शेवटी प्रकरण महिला बाल कल्याण सभापती सविता पुराम यांनी जि.प. सभागृहात ठेवून कोहळे कुटुंबीयांना १५ हजारांची मदत मिळवून दिली. सविता पुराम यांनी स्वत: मृतकाच्या कुटुंबीयांशी भेट घेवून १५ हजार रुपयांचा धनादेश त्यांच्या सुपूर्द केला. या वेळी भाजपचे तालुका महामंत्री विनोद भांडारकर व सीलापूरचे नागरिक उपस्थित होते.