आरोग्य सभापतीच्या मतदारसंघात डायरीयाची लागण

0
13

सुकळी व ठाणेगाव येथे डायरियाचे थैमान

तिरो़डा,दि.7 : सुकडी येथे आठवडाभरापासून डायरियाची लागण झाली आहे. ठाणेगावात डायरियाचा प्रकोप दिसू लागला आहे. मागील दोन दिवसांपासून ३४ रूग्ण आढळले. त्यामुळे आरोग्य विभागाने या गावात शिबिर लावले आहे.
६ मे रोजी ठाणेगावात २0 लोटांना उल्टी व हगवण लागल्याने त्यांना उपचारासाठी सुकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.त्यात सुरेंद्र पटले (२४), किसन पारधी (६५), प्रताप पाऊलवार (३८), आशा खोब्रागडे. (३५), विजेंद्र मेहर (२८), जीयालाल पटले (५0), शकुंतला खोब्रागडे (५0), जूली लांजेवार (१५), गुलाब बावनकर (४0), सुरेंद्र चौधरी (३0), सुशांत बावनकर (९), महादेव खोब्रागडे (४९), सुनंदा खोब्रागडे (४0), लीला पटले (५0), कविता खोब्रागडे (४0), राजकुमार कापसे (४९), पंचफूला खोब्रागडे (५0), विमला खोब्रागडे. (५0) व अशोक खोब्रागडे (४५) यांचा समावेश आहे.
माजी सरपंच मनोहर खोब्रागडे यांच्या मुलाचे लग्न ३ मेला स्वागत समारोह आयोजित करण्यात आले होते.यावेळी ज्या लोकांनी जेवण केले त्यांच्यावर डायरीयाचा प्रभाव दिसला. त्यांची प्रकृती खालावल्याने सुकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. ५ मे रोजी एकनाथ डोमळे, लीलाधर सोनवाने, बिरनबाईरहांगडाले, नर्मदा बावने, दुर्गाप्रसाद मानापुरे, सरिता रामटेके, भारती डोमडे या आठ जणांना तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. अनुराग सयाम (४) या बालकाला ६ मे रोजी उल्टी झाल्याने त्याला उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यांच्याकडे लग्न होता त्या घरचे मनोहर खोब्रागडे (५८), मनोहरची पत्नी, मुलगी केसलवाड.ा येथील किशोरी मलेवार (३0), ठानेगाव येथील मीता खोब्रागडे (३५), उमरी येथील मीनाक्षी पाटील (३४) व दीपल पाटील (१0) यांना तिरोडाच्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
डायरियाचा प्रकोप झाल्याने ठाणेगावात आरोग्य विभागाकडून शिबिर लावण्यात आले. त्यात सुकळी आरोग्य केंद्राचे डॉ.श्याम खोब्रागडे व इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.घडले यांच्या नेतृत्वात आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आरोग्य सेविका ए.वी.शर्मा, तारा तितिरमारे, प्रतिमा नैकाने, पदमा खोब्रागडे, चव्हाण, गौर, लांजेवार, ठानेगावात कुंदा साखरवाडे, श्रद्धा बोरकर, उमेश्‍वरी सोनवाने, डी.जे.येल्ले, शोभा राठोड, उमा हट्टेवार, एमपीडब्ल्यू अनिल पिरमगढे., लीकेश हरिणखेडे., के.एम. गौर, जी.एम. सोनवाने, नंदा भालाधरे व वीणा पारधी नागरिकांना औषध वितरण करीत आहेत.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिश कळमकर व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सी.आर. टेंभुर्णे यांनी ६ मे रोजी आरोग्य केंद्राला भेट दिली.