गोंदिया : भाजपा गोंदिया ग्रामीण मंडळ अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे संघटनात्मक कामाच्या दृष्टीने कार्यकारी अध्यक्ष पदावर जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार बिसेन यांची नियुक्ती भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केली आहे. तसेच भाजपा गोंदिया ग्रामीण मंडळ कार्यकारी महामंत्री पदावर देवचंद नागपुरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.




