38 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ मुलांना पराठे तर मुलींनी कराटे शिकविणे ही काळाची गरज – अ‍ॅड. राजरत्न...

मुलांना पराठे तर मुलींनी कराटे शिकविणे ही काळाची गरज – अ‍ॅड. राजरत्न आंबेडकर

0
78

गोंदिया,दि.०७ः-क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी मुलीसाठी शिक्षणाची दालने खुले करून महिलांना गुलामगिरीतून मुक्त करण्याची सुरवात केली. भारतीय महिला या दुहेरी गुलामगिरीत जीवन जगत असून सावित्रीमाईंनी दिलेल्या शिक्षणाचा योग्य वापर करून त्या या गुलामगिरीतून मुक्त करू शकतात असे प्रतिपादन दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक अ‍ॅड. राजरत्न आंबेडकर यांनी केले.
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले फॉलोअर्स महिला संघटनांच्या वतीने मैत्री बुद्ध विहार भीमनगरच्या पंटागणावर शुक्रवारला आयोजित क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले याच्या १८९ व्या जयंतीनिमित्त महिला मुक्ती पर्व – तिसरे या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सद्यःस्थितीत समाजात आढळून येणाèया अनेक समस्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. आजच्या परिस्थितीत शिक्षणाचे बाजारीकरण झालेले असून सर्वसामान्यांना दर्जेदार शिक्षण घेणे आवाक्याबाहेरचे झाल्याचे मत व्यक्त करून मुलींनाही मुलांप्रमाणे शिक्षणाची संधी द्यावी सोबतच मुलांना पराठे तर मुलींना कराटे शिकविणे ही काळाची गरज असल्याचे म्हणाले.
उद्घाटन रत्नदीप कांबळे (संस्थापक-अध्यक्ष, बुद्धिस्ट इंटड्ढप्रेनर असोसिएशन ऑफ कॉमर्स एंड इंडस्टड्ढी, नागपूर) यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य वक्ते अ‍ॅड. माधुरी क्षिरसागर तर मार्गदर्शक म्हणून स्वीटी रत्नदीप कांबळे (संस्थापक-सदस्य, बुद्धिस्ट इंटड्ढप्रेनर असोसिएशन ऑफ कॉमर्स एंड इंडस्टड्ढी,नागपूर))उपस्थित होत्या.मुख्य मार्गदर्शक अ‍ॅड. माधुरी क्षीरसागर यांनी स्त्रियांना अजूनही समाजात पुरुषांप्रमाणे बरोबरीचा दर्जा मिळत नसून तिच्या जन्माआधीच तिला संपविले जात असल्याची खंत व्यक्त करून महिलांनी समाजकार्यात आपले स्थान निर्माण करावे तसेच निसर्गाचा समतोल साधण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले. घराबाहेर पडतांना महिलांना अनेक अडचणींना समोर जावे लागत असले तरी ही महिला सर्व अडचणीवर मात करून प्रगतीचे शिखरे सर करीत आहेत ही अंत्यत आनंदाची बाब असल्याचे सांगितले.
उद्घाटक स्थानावरुन्न बोलताना रत्नदीप कांबळे यांनी महिलांनी व्यवसायाभिमुख होणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले आणि त्यांच्या संस्थेकडून (इ.ए.) कडून महिलांना व्यवसायात आणण्याकरिता अनेक सुविधा उपलब्ध आहेत त्याचा लाभ घ्यावा असे म्हणाले. व्यवसायामुळे महिलांची प्रगती अधिक जोमाने होऊ शकते व महिलांचे आर्थिकदृष्टया सक्षमीकरण होऊन त्या समाजाच्या विकासाला सुद्धा हातभार लावू शकतात असे सांगितले. मार्गदर्शक स्विटी कांबळे यांनी महिलांनी दररोजची आपली जबाबदारी पार पाडून एक यशस्वी उद्योजक कसे होता येईल हे विविध उदाहरणाव्दारे पटवून दिले.blank
प्रास्ताविक संघटनेच्या समन्वयक समता गणविर यांनी केले तसेच पाहुण्यांचा परिचय संघटनेच्या समन्वयक सविता उके यांनी करून दिला.जयंती प्रीत्यर्थ महात्मे नेत्रपेढी, नागपूर यांच्या सहकार्याने ११५० व्यक्तींची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. शस्त्रक्रिया आवश्यकता असलेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया महात्मे नेत्रपेढी,नागपूर येथे मोफत करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, गोंदिया व जिल्हा रुग्णालय (केटीएस) यांच्या सहकार्याने उपस्थितांची रक्त शर्करा, रक्तदाब, हृदयरोग, कुष्ठरोग व महिलांची तोडांचा कर्करोग, ब्रेस्ट कॅन्सर व गर्भाशयाच्या कर्करोगाची मोफत तपासणी करण्यात आली.खरबंदा येथील शुभांगी चाणाक्ष कांबळे विद्यार्थिनीने लिहिलेली ज्योती ही पुस्तक शिवाजी प्रकाशन पुणे, मुंबईने प्रकाशित केल्याबद्दल संघटनेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.
दुसèया सत्रात सुमनप्रताप बौद्ध (म.प्र) व निशा बौद्ध (राजस्थान) यांनी जिजाऊ, सावित्री, रमाई, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व अन्य महापुरुषांचे विचार आपल्या संगीतमय प्रबोधनातून उपस्थितापर्यंत पोचून मने जिंकली.संचालन जयंती कार्यक्रमाच्या समन्वयीका कोकिळा राहुलकर आणि वैशाली खोब्रागडे यांनी केले.आभार प्रदर्शनाची धुरा अ‍ॅड. रेखा गजभिये यांनी साभांळली.
आयोजनासाठी ज्योती डोंगरे, अ‍ॅड एकता गणविर, डॉ.शिल्पा मेश्राम, स्मिता गणविर, बबिता गजभिये, वंदना श्यामकुवर, वंदना मडामे, बबिता भालाधरे, उत्तमा गोडांणे,निरंजना चिचखेडे, कविता उके, कुंदा गाडकिने, अल्का भरणे, बेबी गडपायले, मनोरमा रोकडे, कोटांगळे ताई, बेला नंदागवळी, सविता भालाधरे, सविता जवरे, पंचशिला पानतावणे, वंदना वाहणे, उमा गजभिये, छाया बोरकर, वनमाला मेश्राम, रेखा देशमुख, शिल्पा रंगारी, ज्योत्स्ना मेश्राम, विमल मेश्राम, दीपाली वैद्य, सुनंदा रामटेके,सुनीता आगलावे, सुनिता भालाधरे, वाणी लांजेवार, सपना देशभ्रतार, पौर्णिमा नागदेवे, धर्मशिला डहाट, भूमिका रामटेके,सहयोग ग्रुपचे जयेश रामादे तसेच वैद्यकीय चमू डॉ. श्यामसुंदर निमगडे,डॉ. पद्मिनी तुरकर,डॉ. राजेंद्र वैद्य,डॉ. मनोज राऊत, डॉ. प्रशांत मेश्राम,प्रा.नीता खांडेकर, प्रा. अल्का पाटील, प्रा. सुशील वनकर, प्रा.नरेंद्र मेश्राम, प्रा. धर्मवीर चव्हाण, प्रा. उमेश उदापुरे, परिसरातील सर्व बुद्ध विहार, बुद्धिस्ट समाजसंघ यांचे सहकार्य लाभले.