38 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ एकोडी धान खरेदी केंद्राला आमदार फुकेंची भेट

एकोडी धान खरेदी केंद्राला आमदार फुकेंची भेट

0
22

साकोली,दि.09ःः तालुक्यातील एकोडी येथील शासकीय धान खरेदी केंद्राला भेट देत आमदार परिणय फुके यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे अंकुर फुटलेल्या धानाची पाहणी केली.यावेळी पावसामुळे धानाचे मोठ्या प्रमानात नुकसान झाल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकारी यांना भ्रमणध्वनी करुन केंद्रपरिसरात असलेले सर्व धान खरेदी करण्याचे निर्देश देण्याबाबत चर्चा केली.यावेळी माजी आमदार बाळा काशिवार,जिल्हा परिषद सदस्य नेपालभाऊ रंगारी,राजेश बांते,सभापती उषाताई डोंगरावर,उपसभापती वर्षाताई कापगते,रमेश खेडीकर,एकोडी सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष सतीश समरीत,यादव कापगते,भोजराम कापगते,भाष्कर चिरवतकर तसेच एकोडी येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.