40.3 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ अर्धवट पाॅवरहाऊसचे काम पुर्ण करा-आ.चंद्रिकापुरे

अर्धवट पाॅवरहाऊसचे काम पुर्ण करा-आ.चंद्रिकापुरे

0
18

सडक अर्जुनी,दि.09ः- तालुक्यातील  कोसमत़ोंडी परीसरातील शेतकऱ्यांना विजेपासून होत असलेला त्रास लक्षात घेत आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी मुंडीपार येथे तयार करण्यात येत असलेल्या पाॅवर हाऊसला भेट देत पाहाणी केली.तसेच हा भाग नागझिरा अभयारण्याला लागून असल्याने वन्यप्राण्यांचा अधिक वावर होतो,त्यामुळे या परिसरातील गावांना रात्रीच्यावेळी विजपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी अपुर्ण असलेल्या पाॅवर हाऊसचे काम त्वरीत पुर्ण करण्याचे निर्देश विज वितरण कंपनीच्या अभियंत्याला दिले.या पाहणी दरम्यान विजवितरण कंपनीचे अभियंता मदनकुमार नायडु,बाजार समितीचे सभापती डॉ अविनाश काशिवार, सचिन येसनसुरे, अनिरुद्ध बांबोडे, मुनेश्वर कापगते आदी परीसरातील नागरिक उपस्थित होते.