गोंदिया,दि.17ः-कुंभारेनगर गोंदिया येथील कु.पायल नवानंद भौतिक (एमटेक केमिकल इंजीनियरिंग )हिने डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या सीएसआयआर _यूजीसी नेट परीक्षा केमिकल सायन्स मध्ये उत्तीर्ण झाल्याने तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.ही परिक्षा उत्तीर्ण केल्यामुळे ती प्राध्यापकपदासाठी पात्र ठरली आहे. सदर परीक्षा सीएसआयआर _यूजीसी नवी दिल्ली च्या वतीने घेण्यात आली. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले आहे.तिचे सहाय्यक अधिव्याख्याता कुलदीप सिंग, प्रा.उमेश उदापुरे,मधुकरराव मेश्राम, बी.एन .रगांरी ,आर.व्ही.मेश्राम,गणेश हुमने, मयूर रंगारी,संघसेन भौतिक व मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे.





