26.9 C
Gondiā
Sunday, June 28, 2026
Home शैक्षणिक शारदा व मयुरी बहिणींचे सीएच्या परिक्षेत यश

शारदा व मयुरी बहिणींचे सीएच्या परिक्षेत यश

0
22

गोंदिया,दि.17ः-नुकत्याच जाहिर झालेल्या चार्टड अकांऊट्ट(सी.ए.)च्या परिक्षेचा निकाल जाहिर झाला असून गोंदियातील शास्त्रीवार्ड निवासी व पोवार समाज संघटनेचे सक्रिय सदस्य तेजराम पारधी यांच्या दोन्ही सुकन्या कु.शारदा व कु.मयुरीने चार्टड अंकाऊटंटच्या अंतीम परीक्षेत प्राविण्यासह यश मिळविले आहे.त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.तर पोवार समाजात चार्टड अकांऊटंटच्या परिक्षेत उत्तीर्ण होण्याचा बहुमान बहुदा या बहिणीनींच पटकावल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे.राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे जनसवांद सचिव व ओबीसी सेवा संघाचे पदाधिकारी प्रा.संजीव रहांगडाले,युवा स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे,शास्त्रीवार्ड संघटनेचे खुशाल कटरे,आर.डी.कटरे,कृष्णा पारधी यांच्यासह समाजबांधवानी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.