गोंदिया,दि.23ःजिल्ह्यातील आदिवासी नक्षलग्रस्त भागात असलेल्या शाळांमध्ये स्नेहसमेंलन सोहळा हा क्वचितच व्हायचा.अशाच आदिवासी नक्षलग्रस्त भागात असलेल्या पालांदूर येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत तब्बल 55 वर्षानंतर(दि.19 व 20)स्नेहसंमेलन सोहळा पार पडला. कार्याक्रमाचे उद्घाटन चंद्रकलाबाई कावळे यांच्या हस्ते नूरचंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.दिपप्रज्वन निलेशकुमार ठलाल,आसाराम पालीवार यांनी केले.तर मार्गदर्शक म्हणून एन.एस.लंजे तथा ग्रामपंचायतचे पदाधिकारी,शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
पालांदूर या अतिदुर्गम क्षेत्रातील नक्षलग्रस्त गावाची लोकसंख्या जवळपास ४००० असून दोन शिक्षकी जि.प.ची प्राथमिक शाळा आहे. स्नेहसम्मेलनाचा तर गंध कधी दरवळलेलाच नाही.अश्या गावात तिश्यकुमार भेलावे हे कोयलारी शाळेतून बदलुन पालांदूरच्या शाळेत रुजू झाले.गावकर्यांना शाळेबद्दल अनास्था असल्याने ती अनास्था दूर कशी करावी याबाबद सतत विचार.त्यातच एकलव्य एकल विद्यालयाची शिक्षिका कु.वडगाये यांनी त्यांच्या संस्थेचा एक दिवसीय स्नेहसंमेलन घ्यावा असा विचार मांडला. लगेच तिश्यकुमार भेलावे यांनी 1 दिवसीय स्नेहसंमेलन घेण्यापेक्षा दोन दिवसाचे घ्यावे असे मत मुख्याध्यापक शरद पटलेकडे ठेवले.लगेचच मुख्याध्यापक पटले यांनीही होकार दर्शवत १९/२० जाने.२०२० ला दोन शिक्षकी शाळेत 2 दिवसीय स्नेहसंमेलन पालकांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले.पहिल्या दिवशी एकलव्य एकल विद्यालयाचे कार्यक्रम व दुसर्या दिवशी जि.प.शाळेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.स्नेहंसमेंलनात विद्यार्थ्यांची लेझीम, नाटके, नक्कल ,मुकनाट्य फन्नी डान्स एकल डान्स,कव्वाली,समूह नृत्य तर दुपारी चमचा गोळी,पोता दौड,सोबतच बाल आनंद मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी एकलव्यच्या शिक्षिका कु.वडगाये, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल आंबेडारे व सर्व पालकांनी सहकार्य केले.संचालन तिश्यकुमार भेलावे यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक शरद पटले यांनी केले.आभार महेंद्र राहांगडाले यांनी केले.





