गोरेगाव,दि.24ः- रोजगार हमी योजनेंतर्गत तसेच विविध योजनेंतर्गत केलेल्या कामांचा निधी त्वरित मिळण्याबाबत तसेच विविध समस्यांच्या मागण्यासाठी २३ जानेवारी रोजी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सोमेश्वर रहांगडाले यांच्या नेतृत्वात अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना निवेदन देण्यात आले. पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत मागील दोन-तीन वर्षापासून रोजगार हमी योजनेतंर्गत सिमेंट कॉक्रेंट रस्ते, नाली बांधकाम, पादंन रस्ते, शेळी गोठे, गाय गोठे, सिंचन विहीर, शोषखड्डे, शौचालय, मोरी बांधकाम, रस्ता खडीकरण, तलाव खोलीकरणातुन माती वाहतुक याप्रकारचे व इतर कामे रोजगार हमी योजने अंतर्गत पूर्ण करण्यात आले असून वरील कामापैकी अकुशल निधी मिळालेली आहे कुशल निधीचे २ कोटी ६३ लक्ष रूपये निधी शासनाकडे प्रलंबित आहे.
सदर निधी न मिळाल्याने तालु्नयातील सर्वच ग्रामपंचायती विकासापासून दुर आहेत. त्यामुळे अकुशल कामाची ५ लक्ष रूपयाची अट रद्द करून पुर्णतः २५ लक्ष करण्यात यावी, प्रत्येक ग्रामपंचायतीला गायगोठे १० व शेळीगोठे १० असे प्रमाणे देण्यात यावे, सरपंच, उपसरपंचाचे मानधन त्वरित पाठविण्यात यावे, तसेच सदस्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, संगणक ऑपरेटरचे पगार व नियु्नतीचे अधिकार ग्रामपंचायतला देण्यात यावे, प्रत्येक ग्रामपंचायतीला नगर पंचायतीप्रमाणे कमीत कमी अंदाजे विकास कामासाठी लोकसंख्यानिहाय ५० लक्ष पर्यंतची निधी देण्यात यावी, प्रत्येक ग्रामपंचायतीला शुद्ध पेयजल योजनेकरीता ५ लक्ष रूपयाची निधी ग्रामपंचायतला पुरविण्यात यावी, प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत मिळणारे घरकुलची संख्या वाढवून देण्यात यावी व प्रलंबित असलेली निधी त्वरित देण्यात यावी.
तसेच घरकुलची निधी कमीत कमी २.५ लक्ष रूपय नगर पंचायतीप्रमाणे करण्यात यावी, ग्रामपंचायतीला साठा पुरवठा करणारे कंत्राटदार हे साठा पुरवठा करत नसून दुसèयाकडून साहित्य खरेदी करावे लागते. व सदर पुरवठादार हे नावापुरतेच त्या ग्रामपंचायतीला आपले ई-टेंडर करून रॉयल्टी न पुरवता व साहित्य न पुरवता त्या ग्रामपंचायतच्या सोबत फसवणूक करण्याचे काम चालु ठेवलेले आहे या विषयावर तोडगा काढण्यात यावा, २५१५ योजनेतंर्गत पूर्ण झालेल्या कामाची निधी त्वरित पाठविण्यात यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सोमेश्वर रहांगडाले यांच्या नेतृत्वात डेमेंद्र रहागंडाले, अल्काबाई पारधी आदी उपस्थित होते.





