वाशिम, दि.२४ : भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार २५ जानेवारी २०२० रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ सर्व नागरिकांना दिली जाते. जिल्हाधिकारी कार्यालयात आज, २४ जानेवारी २०२० रोजी आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली.यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे, भूसंपादन अधिकारी सुहासिनी गोणेवार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मतदार जागृती रॅलीचे आज आयोजन
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शनिवार, २५ जानेवारी २०२० रोजी सकाळी ९ वाजता मतदार जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक हे रॅलीला हिरवी झेंडी दाखवतील. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, तहसीलदार विजय साळवे यांची उपस्थिती राहणार आहे. शिवाजी हायस्कूल येथून रॅलीला सुरुवात होईल. पाटणी चौक, अकोला नाका, नवीन नगरपरिषद इमारत मार्गे तहसीलदार कार्यालय येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप होणार आहे.





