36.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home शैक्षणिक चेस प्रशिक्षणामुळे इंग्रजी भाषेची आवड निर्माण झाली-गटशिक्षणाधिकारी मांढरे

चेस प्रशिक्षणामुळे इंग्रजी भाषेची आवड निर्माण झाली-गटशिक्षणाधिकारी मांढरे

0
49

अर्जुनी मोरगाव,दि.25ःइयत्ता नववी व दहावीला इंग्रजी भाषा शिकविणारे शिक्षकांसाठी आयोजित तीन दिवसीय चेस इटिएफ प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदियाचे वतीने अर्जुनी मोरगाव येथे आयोजित केले होते.सदर प्रशिक्षण केंद्राला गटशिक्षणाधिकारी आर.एल. मांढरे यांनी भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधत चेस इटिएफ प्रशिक्षण विद्यार्थी व शिक्षकांना फायद्याचे असल्याचे सांगितले.सहज हसत खेळत विविध प्रकारचे कौशल्य व तंत्र वापरून इंग्रजी भाषा शिकवली जात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेची आवड निर्माण झाली आहे असे मत व्यक्त केले.
सदर प्रशिक्षण दि १७ ,१८ व २३ जानेवारी रोजी आयोजित केले होते.यात तालुक्यातील एकुण एकोणचाळीस शिक्षकांचा सहभाग होता त्यात पाच मुख्याध्यापक होते. चेस प्रशिक्षण शिक्षकांना व विद्यार्थ्यांना सुद्धा अत्यंत उपयुक्त असल्याचे मत मुख्याध्यापक आर टी काशिवार, मुख्याध्यापक किशोर शंभरकर व चंद्रशेखर साखरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.तसेच कांतिकुमार बोरकर,अशोक कापगते,टि के भेंडारकर,कुठे आर जी कंटाळे,मनोहर पाऊलझगडे व आदि उपस्थित शिक्षकांनी चेस प्रशिक्षण इंग्रजी भाषा शिकणे आणि शिकवणे यासाठी उपयुक्त असुन यामुळे विद्यार्थी आता इंग्रजी भाषा बोलु लागले.तसेच माईंडफुल लर्निंग बाबत तसेच अध्ययन अध्यापनात तंत्रज्ञान वापरून प्रभावीपणे अध्यापन कार्य करणे सोपे झाले आहे.शाळांमध्ये शनिवार इंग्रजी भाषा दिवस साजरा केला जातो आहे यामुळे विद्यार्थी इंग्रजी भाषेत भाषण, कविता गायन ,संभाषण, परिपाठ इंग्रजी भाषेत सादरीकरण करु लागलेत ही चेस प्रशिक्षणाचीच फलनिष्पत्ती असल्याचे मत तज्ज्ञ मार्गदर्शक ए पी मेश्राम जी प हायस्कूल सडक अर्जुनी यांनी समारोपीय प्रसंगी सांगितले.सदर प्रशिक्षण यशस्वी आयोजनासाठी कु त्रिवेणी रामटेके यांनी प्रशिक्षण समन्वयक म्हणून काम केले तर सत्यवान शहारे साधन व्यक्ती गटसाधन केंद्र अर्जुनी मोरगाव यांनी सहकार्य केले.सदर प्रशिक्षणात शिक्षक अनिल मेश्राम यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले.