32.9 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home विदर्भ चांदा ते बांधाची व्याप्ती वाढवून गडचिरोलीचा समावेश त्यामध्ये करणार-मंत्री विजय वडेट्टीवार

चांदा ते बांधाची व्याप्ती वाढवून गडचिरोलीचा समावेश त्यामध्ये करणार-मंत्री विजय वडेट्टीवार

0
36

गडचिरोली,दि.25: चांदा ते बांधा यामधून राज्याचा विकास साधला जातोय यामध्ये गडचिरोलीचा प्रामुख्याने समावेश करुन चांदा ते बांधा या योजनेचा विस्तार करणार असे प्रतिपादन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. गडचिरोली येथे ते विविध विकास कामांचा आढावा घेणेसाठी आले होते. यावेळी त्यांचे स्वागत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकाडलवार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, अपर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे व विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी मंत्री महोदय यांनी विविध कामकाजाबाबत आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की गडचिरोली जिल्हा हा दुर्गम जिल्हा आहे. या ठिकाणी रोजगार निर्मिती होणे गरजेचे आहे. कौशल आधारीत प्रशिक्षणातून नवनवीन उद्योग व्यवसाय निर्माण झाल्यास इथल्या लोकांना काम मिळेल. याचबरोबर जिल्ह्यातील मानव विकास निर्देशांक वाढला पाहिजे. त्यांनी यावेळी इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांसाठी दोन वसतिगृह मंजूर केली आहेत आणि त्यासाठी जागेचा प्रस्ताव तात्काळ सादर करा अशा सूचना दिल्या. VJNT  मुलांना आता नामंकित शाळेत प्रवेश दिला जाणार आहे असे त्यांनी सांगितले. संबंधित विभागाला आताच याबाबत लोकांना माहिती द्या म्हणजे पुढील शैक्षणिक वर्षात त्यांना त्याचा लाभ घेता येईल अशा सूचना दिल्या.

इतर मागास वर्गातील अपंग, विधवा व परितक्त्या महिलांना गडचिरोलीमध्ये 300 घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. याबाबत लवकरच शासन निर्णय निघेल तसेच इतर मागास वर्गातील लोकांसाठी ओबीसी महामंडळाकडून 1 लक्ष रुपयांपर्यंत बीन व्याजी कर्जपूरवठा व्यावसायासाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्येही आपल्या जिल्ह्यासाठी 300 लोकांचे उद्दिष्ट देणेत आले आहे. याबाबत आवश्यक माहिती लोकांना द्यावी असे त्यांनी संबंधित विभाग प्रमुखांना सूचना दिल्या.  आढावा बैठकीत पोलीस विभागाच्या विषयावर बोलतांना ते म्हणाले की पोलीस भरती प्रक्रिया लवकरच सुरु होईल. बिंदू नियमावलीबाबत शासन निर्णय येत आहे. जिल्ह्यातील रीक्त पदे  तात्काळ भरावीत.

मेडीकल कॉलेजला आदिवासी विभागाकडूनही निधी मिळणारगडचिरोली जिल्ह्यातील प्रतिक्षेत असलेल्या मेडिकल कॉलेजच्या कामाला गती दिली जाणार आहे. यासाठी आदीवासी विभागातूनही निधी दिला जाणार आहे. जागेसाठी यावेळी विविध पर्यायांवर चर्चा झाली. याबाबत लवकरच ते जिल्हाधिकारी, शल्य चिकित्सक यांना बैठकीसाठी बोलवणार असे ते म्हणाले. या बैठकीचे आयोजन मुंबई येथे केले जाणार आहे.