गोरेगाव,दि.31: स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंटएण्ड सायन्स ज्युनियर कॉलेज गोरेगाव मधील वार्षिक स्पोर्ट डे व स्नेहसंमेलन दी 28 व 29 जानेवारी 2020 ला उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी शाळेच्या माध्यमातून स्नेहासम्मेलनाचे आयोजन केले जाते. स्पोर्ट डे मध्ये भाग घेऊन प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पत्कविलेल्या विध्यार्यांच्या मेडल देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये माता पालक तसेच पिता पालक यांच्या करीत सुद्धा खेळाचे आयोजन केले गेले होते. यामध्ये पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.विजयी पालकांचा मेडल देऊन सत्कार करण्यात आला. 29 जानेवारीला समेहसम्मेलनाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नर्सरी ते वर्ग 12 च्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांना प्रदर्शित केले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी रंगारंग कार्यक्रमाची प्रस्तुती या माध्यमातून दर्शविली. सर्व शिक्षकांनी तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी जगत महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस.एच.भैरम अध्यक्षस्थानी होते. तर रामभाऊ हरिणखेडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.यावेळी डेमेन्द्रभाऊ रहांगडाले,रामुजी मुंगमोडे,श्री तुलसी शिक्षण संस्थेचे सचिव आर.डी.कटरे, नमन एच जैन,सुरेखाताई कटरे,प्राचार्य छाया पी. मेश्राम, वैभव कटरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद तसेच इतर कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.





