गडचिरोली,दि.31:- मराठा व ब्राम्हण समाजातील बेरोजगार युवक युवतींना आर्थिक मदतीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ योजनेअंतर्गत मोठया प्रमाणात कर्ज योजना आखण्यात आली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महांमडळ या योजनेचे जिल्हास्तरीय समन्वक अमरीन पठाण यांनी जारी केलेल्या पत्रकामध्ये मराठा व ब्राम्हण समाजातील बेरोजगार युवक युवतींना आर्थिक मदतीचा हात देणेबाबत आवाहन केले आहे. उद्योग सुरु करण्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महांमडळांनी राज्यात आतापर्यत 526 कोटी 71 लाख 57 हजार 282 रूपयाचे कर्ज वाटप केलेले आहे. 30 हजार 311 लाभार्थीना या योजनेचा लाभ घेतलेला आहे. गडचिरोली जिल्हयामध्ये या संदर्भात लाभ घेण्या-यांची संख्या अत्यल्प प्रमाणात असून मोठया संख्येने जनतेन लाभ घ्यावा असे त्यांनी म्हटले आहे.
राज्य शासनाने प्राध्यान्याने मराठा प्रवर्गातील व ज्यांच्या करीता महामंडळ अस्तित्वात नाही अशा फक्त महाराट्रातील नागरीकांसाठी ही योजना सुरू केली आहे. उमेदवारांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणारी राज्य शासनाची ही एकमेव योजना आहे. लाभार्थ्याचे कर्ज मंजूर झाल्यावर त्यावर व्याज भरण्याची जबाबदारी ही राज्यशासन घेत आहे. बॅंकानाही या योजनेबाबत विश्वास निर्माण झालेला आहे. काही ठिकाणी बँकेकडून टाळाटाळ होत असल्यास तक्रारी केल्यानंतर महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातील समन्वकांच्या मार्फत या संदर्भात हस्तक्षेप करण्यात येतो. त्यामुळे या योजनेचा लाभ कृषी सलग्न व पारंपारिक उपक्रम तसेच लघू व मध्यम उद्योगासाठी घेण्यात यावा. उत्पादन व्यापार विक्री सेवा या क्षेत्रासाठी देखील या योजनेतून कर्ज उपलब्ध केले जाते. पुरुष वर्गासाठी 18 वर्षापासून 50 वयोगटापर्यंत, तर महिला वर्गासाठी 18 ते 55 असा वयोगट निश्चित करण्यात आला असून त्यातून वैयक्तीक कर्ज व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना अशा दोन विभागाअंतर्गत कर्ज देण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनेला जिल्हयात देखील चांगला प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाने केलेली असून अधिक माहिती करीता सहाय्यक आयुक्त, जिल्ह कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बँरेक क्रमांक-2 कॉम्प्लेक्स, गडचिरोली, तसेच जिल्हा समन्वयक अमरीन पठान मो.क्र.9823819137, 07132-222368 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.



