30.2 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home मराठवाडा/खान्देश हळदी-कुंकू कार्यक्रमातून महिला सक्षमीकरणाचा नारा

हळदी-कुंकू कार्यक्रमातून महिला सक्षमीकरणाचा नारा

0
52

जत(सांगली)दि.31ः- तालुक्यातील पांडोझरी ग्रामपंचायत तर्फे शनिवारला आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण ,स्वसंरक्षण यावर जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला होता.हळदी कुंकू कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.महिलांची ओटी भरुन त्यांना वाण व टिपीन डबा भेट देण्यात आले.गावातलं गावपण माणसातलं माणूसपण संपत चाललंय या विषयावर व त्यानंतर महिलांवर वाढलेल्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त करत महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृतीपर संरक्षणाबाबत डॉ.स्वाती शिंदे- पवार यांनी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सरपंच जिजाबाई कांबळे,उपसरपंच नामदेव पुजारी, ग्रामविस्तार अधिकारी दत्ताञय पोतदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आण्णासाहेब गडदे,तुकाराम कोरे,आबासाहेब लोखंडे,आप्पा कटरे, रुक्मिणी गडदे ,कमलाबाई पुजारी,शिवबाई मांग,योजना पुजारी,सविता मोटे,सुरवती गडदे, पांडोझरी परिसरातील शिक्षक उपस्थित होते.450 पेक्षाही अधिक महिलांची उपस्थिती राहिली हळदीकुंकू मेळावा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सर्व सदस्य व सरपंच व उपसरपंच यांनी परिश्रम घेतला.