सालेकसा,दि.31:. तालुक्यात मोठय़ा प्रमाणात रेती तस्करी केली जात आहे. मात्र तालुका प्रशासन गाढ झोपेत आहे की काय ? असा प्रश्न सालेकसा तालुक्यातील जनतेपुढे निर्माण होत आहे. तालुक्यात ठेकेदारी करणारे व्यक्ती वाघ नदीवर मोठय़ा प्रमाणात रेतीची तस्करी करीत असून ह्यरेती तस्करी जोमात, तालुका प्रशासन कोमात असे सर्वत्र बोलले जात आहे.
सालेकसा तालुक्यातील वाघ नदी काठावर असलेल्या नदीटोला, चजेर्टोला, बोदलबोडी, तिरखेडी, सालईटोला, भाडीपार ह्या नदीघाटावर मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू आहे. मात्र तालुका प्रशासन गाढ झोपेत आहे. तहसीलदारांसह स्थानिक तलाठ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने रेती तस्करांचे चांगलेच फावत आहे. भरदिवसा खुलेआम नदीतून रेती ट्रॅक्टरने वाहतूक होताना नागरिकांना दिसत असताना प्रशासनाला कसे दिसत नाही, असा प्रश्न निर्माण होत असलयाने अधिकारी-कर्मचारी व रेती तस्कर यांचे संगनमत आहे की काय ? अशी चर्चाही होत आहे. तालुक्यात खुलेआम अवैध रेती तस्करी केली जात आहे.
तालुक्याची रेतीच्या माध्यमाने असलेली संपत्ती स्वत:ची देशोधडीला लावण्याचे काम रेती माफिया करीत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन रेती तस्करांवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.





