वाशीम : स्थानिक राजस्थान महाविद्यालयाच्या वतीने दत्तक ग्राम बोर्हाळा हिस्से येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात ‘संवाद कला’ या विषयावर बोलतांना रेडिओ वत्सगुल्मचे निवेद्क देव इंगोले यांनी सुसंवादातून कुटुंबातील सदस्यांमध्ये होणारे कलह सहज थांबवता येतील असे प्रतिपादन केले, पुठे बोलतांना इंगोले म्हणाले संवाद कला हि फक्त माध्यमा पुरतीच मर्यादित नसून दैनंदिन व्यवहारातही सुसंवाद झाल्यास प्रयेकाला आपलं म्हणणं इतरांना सहज पटवून सांगता येईल. संवाद कला हे एक शास्त्र आहे व पर्यंत पूर्वक ते सर्वांना साध्य करता येईल. यावेळी त्यांनी संवादातील अडथळे व ते दूर करण्यासाठी काय प्रयत्न करावे याविषयी मार्गदर्शन करून रेडिओ वत्सगुल्म ९०. ८ एफ.एम याविषयी विध्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करत असल्याचं सांगितलं.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे कार्यक्र्माधिकारी प्रा.संदीप गोरे प्रा.डॉ. शैलेश सोनोने, सर्पमित्र समीर शेख, प्रा.गोवर्धन उंडाळ,यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्पमित्र समीर शेख यांनी सर्पदंश व प्राथमिक उपचार याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी विध्यार्थी व गावकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.





