स्व.मनोहरभाई पटेल जयंती निमित्त सोहळ्याची जय्यत तयारी
गोंदिया,दि.०७: दरवर्षीप्रमाणे स्वनामधन्य नेता तथा शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मनोहरभाई पटेल अॅक़डमी, गुजराती केलवणी मंडळ व गोंदिया शिक्षण संस्थेच्यावतीने गोंदिया-भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील एकुण १३ गुणवंत विद्याथ्र्यांना सुवर्ण पदकाने सम्मानित करण्यात येणार आहे. ९ फेबु्रवारी रोजी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याची जय्यत तयारी माजी आमदार राजेंद्र जैन व वर्षाताई पटेल, हरिहरभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ९ फेबु्रवारी रोजी स्थानिक धोटे बंधू महाविद्यालयाच्या प्रांगणात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी भव्य मंडप उभारण्यात येत आहे. सोहळ्यात सहभागी होणाèया विद्यार्थी, पालक व गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी विशेष व्यवस्था होत आहे. या सोहळ्याचे उद्घाटन राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या हस्ते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. विशेष अतिथी म्हणून विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले, राज्याचे गृहमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, अभिनेते सुनील शेट्टी यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच आमदार राजूभाऊ कारेमोरे, आमदार मनोहर चंद्रीकापुरे, आमदार सहषराम कोरोटे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व माजी आमदार उपस्थित राहणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदा गोंदिया जिल्ह्यातून दहावी परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाèया आदित्य राजू राहूलकर, मुलीमध्ये कल्याणी प्रभू सोनवाने, वर्ग १२ वीत प्रथम क्रमांक प्राप्त सिया धमेंद्र ठाकुर, बीएमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त अर्चना रqवद्र राऊत, बी.कॉमचा अक्षयकुमार सदाशिव शिवणकर, बीएससीमध्ये प्रथम मेघा रमेश अग्रवाल, अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रथम सोनिया महेंद्र लांजेवार, भंडारा जिल्ह्यातील एसएससीमध्ये प्रथम प्रतिक्षा प्रमोद बेदपुरीया, बारावीत प्रथम खुशी संतोष गंगवानी, बीएमध्ये प्रथम सुषुप्ती गुणवंत काळबांधे, बी.कॉमची पायल चोपडे, एसससीमधील प्रथम समिक्षा बोरघरे, अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रथम मनिषा श्यामराव भदाडे या विद्याथ्र्यांना सुवर्ण पदकाने सम्मानित करण्यात येणार आहे.





