वाशिम, दि. ०७ : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत १० रुपये लक्ष पर्यंतच्या वैयक्तिक कर्जावरील व्याज परतावा व १० लक्ष ते ५० लक्ष रुपयेपर्यंतच्या गट प्रकल्प कर्जावरील व्याज परतावा योजना राबविण्यात येते.उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (१२ टक्के च्या मर्यादेत) त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. या योजनेसाठी इतर मागासवर्ग प्रवर्गातील १८ ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्ती पात्र आहेत. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागाकरिता इतर मागास प्रवर्गातील नॉन क्रिमीलेअरकरिता निर्धारित केलेल्या निकषानुसार राहील (सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार). अर्जदाराचे आधारकार्ड संलग्न बँक खाते असणे अनिवार्य आहे. या कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषानुसार राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी www.msobcfdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एम. व्ही. उमक यांनी केले आहे.
Home रोजगार/व्यापार महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजांचा लाभ घेण्याचे आवाहन



