33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home Featured News आई घराचे मांगल्य तर वडील कणा असते

आई घराचे मांगल्य तर वडील कणा असते

0
56

विवेक खडसे: एकल व समूह नृत्य स्पर्धेचे बक्षीस वितरण
आमगाव,दि.08: आई आपण पुस्तकांमधून, कथा-कादंबºयांतून व रोजच्या जगण्यातून आपण आईला समजतो. परंतु आपल्यासाठी राबराब करणारा बाप लेकर समजत नाहीत. माझ्यासाठी काय केल असे म्हणणाºया पोराला त्याचे वडील नसल्यावर त्या वडीलाची किंमत समजते. आई घराची मांगल्य तर वडील कणा असते असे, उदगार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी काढले.
पदमपूर येथील उडान बहुउद्देशिय विकास संस्था व यशोदा बहुउद्देशिय विकास संस्थेतर्फे जेष्ठ नागरिकांच्या सन्मानासाठी घेतलेल्या हिरावतोय काठीचा आधार या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करतांना बोलत होते. कार्यक्रमात रंगत घालण्यासाठी आयोजित एकल व समूह नृत्य स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, प्रेस ट्रस्ट आॅफ गोंदियाचे अध्यक्ष अपूर्व मेठी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, अभियंता सुनिल तरोणे, आमगावचे ठाणेदार श्यामराव काळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सिंह, हभप मुक्ता हत्तीमारे, माजी सरपंच सिता पाथोडे, विजय ब्राम्हणकर उपस्थित होते. सदर स्पर्धेत नागपूर, भंडारा, छत्तीगडचा रायपूर, मध्यप्रदेशच्या बालघाट व गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील स्पर्धक या स्पर्धेत उतरले होते. एकलनृत्य स्पर्धेचा २ ग्रॅम सोन्याचे नाणे प्रथम पारितोषीक बालाघाट येथील सन्नी मडावी, १ ग्रॅम सोन्याचे नाणे द्वितीय पुरस्कार छत्तीसगडच्या रायपूर येथील अंतरा तरोणे हिने पटकाविला. अर्धा ग्रॅम सोण्याचे नाणे तृतीय पुरस्कार आमगाव येथील विद्या धुर्वे, प्रोत्साहनपर अदीश्री नांदगावे, पुजा भारती, नंदीनी बावनथडे यांना प्रत्येकी दहा ग्रॅम चांदीचे नाणे, समूहनृत्यात एमसीपी ग्रूप गोरेगावला ७००१ प्रथम, युनिक डान्स आमगाव ग्रूपला ५००१ रूपयाचा द्वितीय तर डी बाईज ग्रूपला ३००१ रूपयाचा तृतीय पुरस्कार देण्यात आला. यात प्रोत्साहनपर तीन ग्रूप लोकेश जीवतोडे ग्रूप, जि.प. स्कूल लोहारा व गुडलक ग्रूप यांना प्रत्येकी दहा ग्रॅम चांदीचे नाणे देण्यात आले. दोन्ही गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार घेणाºया गटाला पुरस्कारासह सन्मानचिन्ह, गौरवपत्र देण्यात आले. यावेळी समाजात उत्कृष्ट कार्य करणाºया तरूणांचा, आदर्श शेतकरी, आदर्श शिक्षीका प्रभा गायधने, गुणवंत विद्यार्थीनी स्मीता हुकरे यांचा सत्कार करण्यात आला. सदर स्पर्धेचे परिक्षण मुंबई येथील विशाल कांबळे, हर्षज पुंडकर, नागपूर येथील गुडीया बडोले व दिल्ली येथील कुंदन गौतम यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन नरेश रहिले, सुनंदा हुकरे, रामभरोस चक्रवर्ती तर आभार रविकांत पाऊलझगडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी संयोजक नरेश येटरे, सहसंयोजक प्रा. अर्चना चिंचाळकर, आशिष तलमले, अतुल फुंडे, विजय कोरे, अमित हेमने, सुनील हुकरे, जीवन फुंडे, प्रेमानंद पाथोडे, अमित हेमने, प्रदीप कावरे, आशिक वाढई, लोकेश आगाशे, दिनेश गिºहेपुंजे, प्रिनल वंजारी, गोविंद बहेकार, मोहीत फुंडे, राकेश नेवारे,नरेश बोहरे, हिमालय राऊत, सचिन तलमले, धिरज भांडारकर, आकाश पटले, रोशनी गजभिये, अंकेश गणवीर, मजूर वंजारी, प्रवीण भोंडेकर, हितेश मेश्राम यांनी सहकार्य केले.
या जेष्ठांचा झाला सन्मान
हिरावतोय काठीचा आधार या कार्यक्रमात जेष्ठांचा सन्मान करण्यात आला. यात लक्ष्मी तुकाराम हुकरे, हिरण मंगलदास बहेकार, रूकमा केशोराव हुकरे, छातिया येथील बळवंतराव मेंढे, पारबता गायधने, कुंता शिवणकर, किडंगीपार येथील लीला पाऊलझगडे, पांडुरंग तलमले, केशर फुंडे, राध्येश्याम डोये, कुशमन गिºहेपुंजे, बोथली येथील बाळकृष्ण येटरे, गीरजा तरोणे, डॉ. एम.ए. पारधी, आय. पठाण, गंगा हुकरे व मालन नेवारे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.