आमगाव,दि.09- विदर्भ तेली समाज महासंघ आमगाव शाखेच्यावतीने तेली समाज मेळावा व सत्कार समारंभ तसेच संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव रविवारी सकाळी ११ वाजता आदर्श विद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. उद््घाटन कालकाप्रसाद साहू यांच्या हस्ते शंकर क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेत करण्यात येणार आहे. मार्गदर्शक म्हणून ओबीसी संघाचे जिल्हाध्यक्ष माजी प्राचार्य बी.एफ.करमकर, प्रा. प्रतिभा गिर्हेपुंजे, प्रा.सागर काटेखाये, प्रा.जीवन जिभकाटे, लिलाधर गिर्हेपुंजे, सुभाष आकरे, किशोर निखारे, व इतर मान्यवर उपस्थित राहतील.
कार्यक्रमात इयत्ता १0 व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे तालुकाध्यक्ष सोमेश्वर पडोळे, सचिव कुवरलाल कारंजेकर, जानकीप्रसाद हटवार यांनी कळविले आहे.




