35.6 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home Top News दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठीचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे तत्काळ सादर करा- धनंजय मुंडे

दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठीचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे तत्काळ सादर करा- धनंजय मुंडे

0
36
Mumbai Feb. 11 :- NCP leader Dhananjay Munde address to media at NCP Bhavan in Mumbai. ( pic by Ravindra Zende )

मुंबई, दि. 13 : दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी केंद्र पुरस्कृत योजनांचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे तत्काळ सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.केंद्र पुरस्कृत योजनांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यासाठीच्या राज्यस्तरीय समितीची बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी श्री.मुंडे बोलत होते.

श्री.मुंडे म्हणाले, केंद्र पुरस्कृत दिनदयाळ दिव्यांग पुनर्वसन योजनेंतर्गत दिव्यांग व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी स्वयंसेवी संस्थामार्फत विविध प्रकल्प राबविण्यात येतात तसेच दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने वाटप या योजनेंतर्गत स्वयंसेवी संस्थामार्फत दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविण्यात येतात.SIPDA-Scheme for Implementation of Rights of Persons with Disabilities Act, 2016 या योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांमार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी विविध सेवासुविधा, विविध थेरपी, सर्वेक्षण, विविध योजनांसाठी समुपदेशन व मदत करणे, जनजागृती करणे, त्वरीत निदान व शीघ्र हस्तक्षेप, शिबिरांचे आयोजन करुन सहाय्यक साधने पुरविणे, शासन व धर्मादाय संस्थांच्या मदतीने सर्जीकलविषयक सुविधा, विविध प्रशिक्षण इ.सेवा व सुविधा पुरविण्यात येतात.यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव पराग जैन, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आदी अधिकारी उपस्थित होते.