35.6 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ नंगपुरा/मूर्री ग्रामपंचायतचे ओमप्रकाश (छोटू) रहांगडाले प्रभारी सरपंच

नंगपुरा/मूर्री ग्रामपंचायतचे ओमप्रकाश (छोटू) रहांगडाले प्रभारी सरपंच

0
35
गोंदिया,दि.13ः तालुक्यातील ग्रामपंचायत नंगपुरा /मूर्री येथील सरपंचावर पारित झालेल्या अविश्वास प्रस्तावानंतर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यावतीने प्रभारी सरपंच म्हणून ओमप्रकाश (छोटू) रहांगडाले यांना नियुक्त केले आहे.त्यासंदर्भातील पत्र 11 फेब्रुवारीला ग्रामसेवक बिसेन यांच्या हस्ते देत सरपंच म्हणून पदभार सोपवण्यात आले. ग्रामसभेत तत्कालीन सरपंच यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव पारित झाल्याने त्यांना पदावरून बरखास्त करण्यात  आल्याचे पत्र  गटविकास अधिकारी जावेद इनामदार यांनी ग्रामसेवकाला दिले. त्या अनुषंगाने नव्याने सरपंच पदावर प्रभारी नियुक्ती करण्यात आली.विद्यमान उपसरंपच ओमप्रकाश रहांगडाले यांची  सर्वानुमते सरपंच म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी प्रमुख्याने ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संदीप टेंभेकर, माजी उपसरपंच ब्रम्हानंद शहारे, ग्रामपंचायत सदस्य करण टेकाम, तीर्थराज रहांगडाले, मीनाताई सूर्यवंशी, मीनाताई टालटे, पूजाताई बीजेवार, पुष्पाताई शरणागत, सुनंदाताई जांभुळकर, रामेश्वरी बॉमचेर व इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.