गोंदिया,दि.२०ः-जिल्हा परिषदचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी झेनिश चंद्र दोन्तुला यांचे ग्राम पंचायत अधिकारी यूनियन, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, तथा राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती गोंदिया च्या वतीने संयुक्त रित्या स्वागत करण्यात आले.
दिनांक 19/6/26 रोजी ला नव्याने रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी झेनिथ चंद्र दोन्तुला यांचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे व प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर यांचे उपस्थिति मधे पुष्पगुच्छ देऊन संपूर्ण जिल्ह्यातील कर्मचारी यांचे वतीने लीलाधर पाथोडे निमंत्रक श्री प्रल्हाद शहारे अध्यक्ष महासंघ तसेच कमलेश बिसेन जिल्हाध्यक्ष ग्राम पंचायत अधिकारी यूनियन तथा उपाध्यक्ष महासंघ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. यावेळी शिष्टमंडळात मध्यवर्ती उपाध्यक्ष रमेश नामपल्लीवार, संतोष तोमर सरचिटणीस, सौरभ अग्रवाल कार्याध्यक्ष, संतोष तुरकर, सुभाष खत्री, यज्ञश मानापूरे, कुलदीप कापगते सरचिटणीस , भगीरथ नेवारे, नर्सेस संघटनेचे सीमा भगत, ललिता गौतम, कल्पना साखरे, संघ मित्रा मेश्राम, सीमा अहिरे, कुणाल रहांगडाले, ओके रहांगडाले, प्रदीप ठाकरे, योगराज बिसेन, रामेश्वर जमाईवार, दीपिका यादव, तेजस्विनी चेटूले, गुणवंत ठाकूर, अंगणी उपरीकर, आनंद चर्जे, शहारे, रेवतकर, शैलेश परिहार, आदी मोठे प्रमाणात कर्मचारी उपस्थित होते.





