गडचिरोली :- रेल्वे स्थानकावर जेव्हा केव्हा मी आर्मीमधील सैनिकांना त्यांची ट्रंक घेऊन कर्तव्यवर जाताना पहायचो तेव्हा त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर निर्माण व्हायचा आणि आपल्यालाही अशीच देशसेवा करण्याची संधि मिळावी या हेतूनेच मी सुद्धा या क्षेत्राकडे वळलो. आणि आज लेफ्टनंट या पदावर विराजमान झालो असे मत स्थानिक गोण्ड्वाणा सैनिकी विद्यालयात मार्गदर्शन पार कार्यक्रमात लेफ्टनंट तुषार फाले यांनी केले
वर्ग नऊ ते बारावीच्या विद्यर्थ्यां करिता गोण्ड्वाणा सैनिकी विद्यालयात ‘ये देश है वीर जवानो का’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांच्या मनात देशाप्रती कायम अभिमान असावा तसेच देशसेवेच्या कार्यासाठी सदैव तत्पर असावेत या उददात्त हेतूने सैन्यातील अधिकार्यांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात विशेष मार्गदर्शक म्हणून गडचिरोलीच्याच मातीतून उदयास आलेले तुषार फाले हे त्यांना लहानपणापासून घडविणारे त्यांच्या आई व मार्गदर्शक म्हणून त्यांच्या पाठीशी असणारे त्यांचे वडील सुरेशराव फाले यांच्यासह प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य संजीव गोसावी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्या ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखडे हे होते.कार्यक्रमाच्या सुरूवातीला अध्यक्षांच्यामार्फत लेफ्टनंट तुषार फाले यांचे विद्यालयाच्यावतीने सन्मांचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला
आपला देश संरक्षणाच्या दृष्टीने बलाढ्य बनावा याकरिता खरी गरज आहे ते आजच्या तरुणांची तरुणांनी आपला अमूल्य वेळ वाया न घालवता योग्य वापर करायला पाहिजे, सैन्यात जायचे लहानपणी ठरविले नव्हते पण आवड आणी करियर दोन्ही एकाच ठिकाणी माला जेव्हा दिसू लागले तेव्हा आपण हा मार्ग स्वीकारला सहजासहजी हे सर्व मिळणे शक्य नव्हते म्हणून ते मिळविण्याकरिता मी खूप मेहनत केली आणी म्हणूनच पाहिल्याच प्रयत्नात वायुदल भुदल व नौदल या तीनही दलाकरिता मी पात्र ठरू शकलो, या क्षेत्रात काम करतांना जे आत्मसन्मान मिळतो ते कदाचितच कुठे मिळू शकेल, म्हणून प्रत्येकाणी या क्षेत्राकडे जाण्याची वाट निवडलीच पाहिजे असे मार्गदर्शनपर मत लेफ्टनंट तुषार फाले यांनी व्यक्त केले. सैन्यात अधिकारी बनण्याकरीत्या द्यावयाच्या CDSE, SSB यासारख्या विविध परीक्षाबद्दल सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.गजानन ढोले यांनी केले तर आभार शाहीद शेख यांनी मानले प्रसंगी प्राचार्य संजीव गोसावी उपप्राचार्या ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखडे व समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी भावी जीवनकरिता शुभेच्छा दिल्या.





