अर्जुनी मोरगाव,दि.14ः-स्वामी विवेकानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय ईटखेडा येथे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.वर्ग अकरावी कडून वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचे तसेच उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भागवतजी पाटील नाकाडे अध्यक्ष न.शि.संस्था ईट. अध्यक्ष व्ही.आर.डांगे प्राचार्य स्वा.वि.वि.ईट. अतिथीगण जे.जी. करंजेकर , एकनाथजी गडपाल सदस्य न.शि.संस्था ईट.. संतोष रोकडे , चेतन शेंडे उपस्थित होते. स्वागत गीतांनी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख अतिथी भागवत पाटील नाकाडे यांनी वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषण देऊन यशाची पायरी गाठावी असे प्रतिपादन केले. जे.जी.करंजेकर सर यांनी सुद्धा निश्चित ध्येय ठेवून यश संपादन करावे. येणाऱ्या परीक्षेत भरघोस यश मिळावे यासाठी शुभेच्छा दिल्या. संतोषजी रोकडे पत्रकार यांनी भावी आयुष्य कसे जगावे? यासाठी कठीण परिश्रमराची गरज आहे. असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणातून निश्चित ध्येय यशाची उतुंग भरारी असते. ध्येय समोर ठेवून कार्य केले तर यश आपल्या पदरी निश्चित पडते. असे प्रतिपादन प्राचार्य व्हि.आर.डांगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.ए.एन.भावे, प्रा.के.एम.पेशने, एच.एस.आदे , एफ.आर भाकरे , एस.एम.आकरे, पी.एम.डोंगरवार, सौ पुष्पा फुंडे, एस.एस.खुणे, एच.सी.जांभळे , हरीजी शेंडे(कनिष्ठ लिपीक), विश्वनाथ हटवार, कार्यक्रमाचे संचालन कु. सिमरन येरकडे केले तर आभार मंथन लोणारे यानें मानले. कु. उज्वला लांजेवार, कु. रक्षा ब्राम्हणकर , कु.अश्विनी मैंद, प्रशांत लांजेवार, चेतन लांजेवार, भैरव सुखदेवे, तसेच वर्ग ११ वीच्या समस्त विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.





